mahaed.com

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना – Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana

Share

Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi yojana

अनुक्रमणिका

योजना :

शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळण्याकरिता केंद्र शासनाने Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana (PM KISAN) १ डिसेंबर २०१८ पासून सुरु केली आहे. या योजने अंतर्गत सरसकट सर्व पात्र (लहान आणि सीमांत, अल्पभुधारक ) शेतकरी कुटुंबास ( पती, पत्नी व त्यांची १८ वर्षाखालील अपत्ये ) रु. २०००/- प्रती हप्ता याप्रमाणे तीन समान हप्त्यात प्रती वर्षी रुपये ६०००/- लाभ देण्यात येत आहे. ( एप्रिल-जुलै , ऑगस्ट-नोव्हेंबर , डिसेंबर-मार्च)

            सदरील लेखात योजनेसाठी अर्ज कसा करावा? योजनेची उद्दिष्टे, पात्रता इ. बद्दल संपूर्ण माहिती मिळेल. 

उद्दिष्टे :

  • लागवडीयोग्य जमीन असणाऱ्या अल्पभुधारक शेतकऱ्यांना निश्चित उत्पन्न मिळून देणे.
  • शेती करताना त्यासाठी लागणारी साधने, पिकांचे आरोग्य उत्तम ठेवण्यासाठी अवश्यक गोष्टींची खरेदी करताना शासनातर्फे रोख स्वरुपात मदत.
  • शेतकऱ्यांना सावकारांच्या जाळ्यात अडकण्यापासून वाचवणे व शेतीचे अधुनिकीकरण करून त्यांना सन्मानजनक जीवनमान देणे.

लाभ :

  • पात्र लाभार्थ्यांना वार्षीक ६०००/- रुपये एकुण तीन समान हप्त्यामध्ये प्रत्येकी २०००/- रुपये याप्रमाणे चार महिन्यानंतर दिले जाते.

पात्रता :

  • Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi या योजनेसाठी ज्या शेतकऱ्यांकडे १ फेब्रुवारी २०१९ पूर्वी लागवडीयोग्य जमीनिची मालकी आहे असे सर्व शेतकरी कुटुंब या योजनेसाठी पात्र आहेत. ( सुरुवातीला ५ एकर पर्यंत लागवडीयोग्य जमीन असणाऱ्याच शेतकरी कुटुंबाला लाभ दिला जायचा पुढे ही अट शिथिल करून ५ एकर पेक्षा जास्त जमीनिची मालकी असणाऱ्या शेतकरी कुटुंबांचा समावेश या योजनेत केला.)
  • एका कुटुंबात एकाच व्यक्तीला या योजनेचा लाभ मिळतो. कुटुंबाची व्याख्या शासनाने नवरा, बायको आणि त्यांची १८ वर्षे वयाच्या आतील अपत्ये अशी केली आहे. उदा. नवरा, बायको आणि त्यांची १८ वर्षे वयाच्या आतील अपत्ये यांच्या नावे जमीन असली तरी फक्त एकालाच या योजनेचा लाभ मिळेल. एखादे अपत्य वयाचे १८ वर्षे पूर्ण झाले असतील तर त्याचाही या योजनेत समावेश करून त्याला लाभ दिला जातो.
  • १ फेब्रुवारी २०१९ नंतर एखाद्या लाभार्थी शेतकऱ्याचा मृत्यू झाला तर त्याच्या वारसांना या योजनेचा लाभ घेता येतो.
  • जमिनीची मालकी सामाईक असेल तर त्या जमिनीचा जास्त भाग ज्याच्या नावे असेल त्याच्या नावे लाभ दिला जातो. जर लागवडीयोग्य जमीन कुटुंबातील दोन किंवा दोनपेक्षा जास्त सदस्यांच्या नावे समान प्रमाणात असेल तर वयाने मोठ्या सदस्याला योजनेचा लाभ दिला जातो.
  • शेतकरी असण्याच्या पात्रतेची cut-off Date १ फेब्रुवारी २०१९ आहे आणि या तारखेत पुढील ५ वर्षे कुठलाही बदल विचारात घेतला जाणार नाही.
  • ईशानेकडील काही राज्यामध्ये आणि झारखंड राज्यात पात्रतेच्या अटी वेगळ्या आहेत.

अपात्रता :

  • खालीलपैकी आर्थिक परिस्थिती प्रगत असणाऱ्या शेतकरी कुटुंबांना Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi या योजनेतून वगळले आहे.
    1. सर्व संस्थात्मक जमीन धारक.
    2. असे सर्व शेतकरी कुटुंब ज्यातील एक किंवा एकापेक्षा जास्त सदस्य खालील प्रकारचे असतील –
      1. आजी किंवा माजी शासकीय पदाधिकारी.
      2. आजी किंवा माजी मंत्री / राज्य मंत्री , आजी किंवा माजी लोकसभा सदस्य / राज्यसभा सदस्य / विधानसभा सदस्य / विधानपरिषद सदस्य , महानगर पालिकेचे महापौर, जिल्हा परिषद सदस्य.
      3. शासकीय सेवेत असणारे किंवा सेवेतून निवृत्त झालेले अधिकारी आणि केंद्र/राज्य सरकारचे मंत्रालय / कार्यालय / विभाग / आणि त्यांचे क्षेत्रीय कार्यालये , सार्वजनिक क्षेत्रातील उपक्रम आणि त्यांची कार्यालये , शासनाच्या स्वायत्त संस्था त्याचबरोबर पंचायत राज व्यवस्थेतील नोकरदार . (या अटीला Multi Tasking Staff / Class IV / Group D employees अपवाद असतील.)
      4. सर्व सेवानिवृत्त पेन्शन धारक ज्यांची पेन्शन १०,०००/- रु. किंवा त्यापेक्षा जास्त आहे. (या अटीला Multi Tasking Staff / Class IV / Group D employees अपवाद असतील.)
      5. मागील आर्थिक वर्षात आयकर भरला आहे अशा सर्व व्यक्ती.
      6. अधिकृत नोंदणी करून काम करणारे डॉक्टर , इंजिनीअर , वकील , सनदी लेखापाल ( Chartered Accountant ) , वास्तुविशारद ( Architects ).
    3. NRI – Non Resident Indians .

अवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड ( पती , पत्नी दोघांचेही )
  • आधार कार्डशी मोबाईल क्रमांक लिंक असावा.
  • रेशन कार्ड
  • सातबारा , ८ अ उतारे. (Digital Utara कसा काढावा?)
  • जमीन नावे आल्याचा फेरफार. (Fer Far कसा काढावा?)
  • विहित नमुन्यातील अर्ज. (Download).

अर्ज कसा करावा ?

  1. स्वतः Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेसाठी नोंदणी करणे.

    1. अवश्यक कागदपत्रे सोबत जोडून विहित नमुन्यातील अर्ज पूर्ण भरावा. सदरील संचिका गावातील ग्रामसेवक , कृषी सहायक अधिकारी व तलाठी यांचेकडून तपासून त्यावर त्यांची सही घ्यावी.
    2. https://pmkisan.gov.in/ हे शासनाचे सदरील योजनेसाठी अधिकृत संकेतस्थळ आहे. संकेतस्थळावर जाऊन उजव्या बाजूचा New Farmer Regsration हा पर्याय निवडावा. फॉर्म भरून Submit केल्यावर मिळणारी पोहच पावती संचिकेस जोडून तालुक्याच्या तहसिल कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावी.
    3. शासनाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून संबंधित अधिकारी लाभार्थ्याच्या नोंदी मंजूर करतील. त्यानंतरच शेतकऱ्याला Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचा लाभ मिळेल.
  2.  CSC सेंटर (सेतू) मधून Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेसाठी नोंदणी करून घेणे.

    1. लाभार्थ्याने संचिका , आधार कार्ड शी लिंक असलेला मोबाईल सोबत घेऊन स्वतः CSC केंद्र चालकाला भेटावे. केंद्रचालक शेतकऱ्याचे आधार प्रमाणीकरण करून सदरील योजनेसाठी अर्ज भरून देतील. फॉर्म भरून Submit केल्यावर मिळणारी पोहच पावती संचिकेस जोडून तालुक्याच्या तहसिल कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांकडे जमा करावी.
    2. शासनाच्या अटी व शर्तींच्या अधीन राहून संबंधित अधिकारी लाभार्थ्याच्या नोंदी मंजूर करतील. त्यानंतरच शेतकऱ्याला Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचा लाभ मिळेल.

टिप – संकेतस्थळावर अर्ज केल्यानंतर पुढील कार्यपद्धती प्रत्येक तालुक्यानुसार वेगळी असू शकते , म्हणून संबंधित विभागाशी संपर्क करून योग्य कार्यवाही करावी.

लाभ वितरणाची पद्धत :

  • आधार संलग्न बँक खात्यातच लाभ दिला जातो. (आधार कार्ड सोबत कोणते बँक खाते संलग्न आहे कसे पाहावे?)

e-KYC कशी करावी ?

          e-KYC म्हणजे electronically Know Your Client. कोणत्याही मध्यस्थांच्या सहभागाशिवाय Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचा लाभ पात्र लाभार्थ्यांच्या बँक खात्यांमध्ये पोहचेल याची खात्री करण्यासाठी  e-KYC करणे गरजेचे आहे. e-KYC दोन पद्धतीने करू शकतो –

  • https://pmkisan.gov.in/ या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उजव्या बाजूचा e-KYC हा पर्याय निवडावा. यासाठी लाभार्थ्याच्या आधार कार्ड शी मोबईल लिंक असणे अवश्यक आहे.
  • आधार शी मोबाईल लिंक नसल्यास जवळच्या CSC केंद्रावर (सेतू) जाऊन Biometric पद्धतीने आधार प्रमाणीकरण केले जाते.

लाभार्थी स्थिती कशी पाहावी ?

https://pmkisan.gov.in/  या शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन उजव्या बाजूचा Know Your Status हा पर्याय निवडावा. लाभार्थ्याला Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचे किती हप्ते मिळाले , किती तारखेला मिळाले याबद्दल माहिती मिळते. तसेच काही कारणाने लाभ मिळण्यात अडचण आल्यास त्याचा तपशील येथेच कळतो.

गावातील लाभार्थी यादी कशी पाहावी ?

प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेच्या अधिकृत संकेतस्थळावर जाऊन Beneficiary List हा पर्याय निवडावा. पुढील माहिती भरून हव्या त्या ठिकाणची सदरील योजनेची लाभार्थी यादी पाहण्यास मिळेल.

Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचा लाभ मिळत होता परंतु आता लाभ मिळत नाही याची खालील काही करणे असू शकतात –

  • जमिनीची माहिती अद्ययावत नसणे.

यासाठी जमिनीचे उतारे घेऊन तहसिल कार्यालयात संबंधित अधिकाऱ्यांना जाऊन भेटावे , ते सांगतील त्या गोष्टी पूर्ण कराव्यात.

  • e-KYC केलेली नसणे.

eKYC कशी करावी ? या मुद्यात सांगितल्याप्रमाणे कार्यावाही करावी.

  • आधार कार्ड सोबत बँक खाते संलग्न नसणे .

शासनाचे आधार शी संलग्न माहितीच्या आधारेच योजनेचा लाभ दिला जाईल असे धोरण असल्याने आधारसोबत बँक खाते संलग्न असणे अतिशय गरजेचे आहे. सदरील त्रुटी दोन पद्धतीने दुरुस्त केली जाऊ शकते –

  • लाभार्थ्याचे ज्या बंकेत खाते आहे त्या बँकेत जाऊन आधार कार्ड , बँक पासबुक ची झेरॉक्स आणि विहित नमुन्यातील अर्ज व्यवस्थित भरून संबंधित अधिकाऱ्यांना द्यावा. अधिकारी अर्जाची तपासणी करून लाभार्थ्याच्या खात्याशी आधार कार्ड लिंक करतील व NPCI mapper update करतील. अशाप्रकारे आधाराशी बँक खाते लिंक झाल्यावर प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजनेचा लाभ मिळण्यास सुरु होईल.
  • लाभार्थ्याने आपल्या जवळील पोस्ट ऑफिस मध्ये जाऊन तेथील अधिकाऱ्यांना Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचे पैसे जमा होणारे खाते उघडून देण्याची विनंती करावी. पोस्ट अधिकारी इंडिअन पोस्ट पेमेंट बँकेचे (IPPB) खाते उघडून देतील व त्या खात्यात Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi योजनेचा लाभ मिळण्यास सुरुवात होईल.

Share

1 thought on “प्रधानमंत्री किसान सन्मान निधी योजना – Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana”

  1. Pingback: Digital Satbara उतारा व फेरफार कसा काढावा?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top