Income Certificate: उत्पन्न दाखला कसा काढायचा ?

Share

Income Certificate arj namuna marathi

अनुक्रमणिका

प्रस्तावना :

शासन समाजातल्या विविध घटकांसाठी त्यांच्या सुधारणेसाठी वेगवेगळ्या योजना राबवत असते. अशा योजनांसाठी अर्ज करायचा असल्यास ‘उत्पन्नाचा दाखला’ (Income Certificate) खूप आवश्यक असतो. उत्पन्नाचा दाखला १ वर्ष आणि ३ वर्ष या दोन प्रकारात काढता येतो. दोन्ही प्रकारच्या दाखल्याची वैधता चालू आर्थिक वर्षापुरतीच मर्यादित असते. (१ एप्रिल ते ३१ मार्च या कालावधीत काढलेला उत्पन्नाचा दाखला ३१ मार्च पर्यंतच वैध असतो.) उत्पन्नाचा दाखला शैक्षणिक, वैद्यकीय, प्रकरण इ. कारणांसाठी काढावा लागतो. Non Creamy-Layer प्रमाणपत्र काढण्यासाठी ३ वर्ष या प्रकारचा उत्पन्नाचा दाखला काढावा लागतो. सदरील लेखात आपण तलाठी उत्पन्न दाखला कसा काढायचा ? उत्पन्न दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे कोणती ? याविषयी सविस्तर माहिती घेणार आहोत. Talathi Income Certificate Form PDF म्हणजेच Talathi utpanna dakhla Form PDF यांचे PDF व Word दोन्ही नमुने येथे मिळतील.

उत्पन्न दाखला कसा काढायचा ?

विहित नमुन्यातील अर्ज भरून आवश्यक कागदपत्रे जोडून तलाठी यांचे कडून तलाठी उत्पन्न दाखला काढा. तसेच तो दाखला, विहित नमुन्यातील अर्ज, आधार कार्ड, रेशनकार्ड सेतु (महा-इ-सेवा) केंद्र येथे जमा करा. केंद्र चालक आपल्याला तहसीलदार यांचा उत्पन्नाचा दाखला काढून देतील. स्वतः उत्पन्न दाखला (Income Certificate) ऑनलाईन काढायचा असेल तर शासनाच्या अधिकृत संकेतस्थळावरून काढू शकता.(पद्धत FAQ या सदरात खाली सांगितली आहे.)

तलाठी उत्पन्न दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • विहित नमुन्यातील अर्ज (तलाठी उत्पन्न दाखला अर्ज येथून Download करा. PDF FileWord File)
  • शिधापत्रिका (रेशनकार्ड)
  • आधार कार्ड.
  • प्रकरण निहाय लागू असणारे इतर पुरावे –
    • कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावे जमीन आहे, त्यांचा जमिनीचा ८ अ, ७/१२ उतारा.
    • आयकर विवरण पत्र.
    • वेतन धारकांसाठी नमुना नंबर १६ ( सरकारी व निमसरकारी अधिकारी / कर्मचारी यांचे साठी)
    • पेन्शनर असल्यास बँकेचे वार्षिक प्रमाणपत्र. इत्यादी.

तहसीलदार उत्पन्न दाखला काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • विहित नमुन्यातील अर्ज (तहसीलदार उत्पन्न दाखला अर्ज येथून Download करा. PDF FileWord File)
  • शिधापत्रिका (रेशनकार्ड)
  • आधार कार्ड.
  • तलाठी यांचे कडून मिळालेला उत्पन्नाचा दाखला.

अर्ज करण्याची पद्धती :

  • आपले सरकार सेवा केंद्र : आपल्या जवळील महा-इ-सेवा केंद्राची माहिती मिळवण्यासाठी येथे पहा. (Click Here
  • अधिकृत शासकिय संकेतस्थळ : mahaonline.gov.in

स्त्रोत :

शासन निर्णय : संकीर्ण १/२०१२/प्र.क्र.१८/ई-१, दिनांक ३१ मार्च, २०१२. Download Here

हे वाचा

  • ग्रामपंचायत दाखले व अर्ज नमुने : Grampanchayat Dakhale, Arj Namune PDF, Word – Click Here 
  • सर्व VLE ना आवश्यक असणारे अर्ज नमुने पाहण्यासाठी क्लिक करा. Click Here

Frequently Asked Questions: FAQ

  • विहित नमुन्यातील अर्ज (तलाठी उत्पन्न दाखला अर्ज येथून Download करा. PDF FileWord File)
  • शिधापत्रिका (रेशनकार्ड)
  • आधार कार्ड.
  • प्रकरण निहाय लागू असणारे इतर पुरावे –
    • कुटुंबातील ज्या व्यक्तीच्या नावे जमीन आहे, त्यांचा जमिनीचा ८ अ, ७/१२ उतारा.
    • आयकर विवरण पत्र.
    • वेतन धारकांसाठी नमुना नंबर १६ ( सरकारी व निमसरकारी अधिकारी / कर्मचारी यांचे साठी)
    • पेन्शनर असल्यास बँकेचे वार्षिक प्रमाणपत्र. इत्यादी.
  • तलाठी उत्पन्न दाखला अर्ज येथून Download करा. PDF FileWord File
  • तहसीलदार उत्पन्न दाखला अर्ज येथून Download करा. PDF FileWord File

शक्यतो अर्ज केल्याबरोबर लगेच मिळतो.

“महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५” नुसार उत्पन्नाचा दाखला जास्तीत जास्त १५ दिवसांत मिळतो.

तलाठी उत्पन्न दाखला म्हणजेच तलाठी उत्पन्न अहवाल. गाव कामगार तलाठी लाभार्थीच्या उत्पन्नाची चौकशी करून त्यांना उत्पन्नाचा दाखला म्हणजेच उत्पन्न अहवाल देतात. तलाठी उत्पन्न दाखला अर्ज नमुना Download करण्यासाठी Click Bellow.

PDF FileWord File

To get income certificate online in maharashtra follow steps given below –

  1. अधिकृत संकेतस्थळावर जा. Click Here
  2. नवीन युजर नोंदणी करा. (‘नवीन युजर ? येथे नोंदणी करा’ या tab मध्ये)
  3. आपले युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगीन करा.
  4. विभाग महसूल , उपविभाग महसूल सेवा मध्ये मिळकतीचे प्रमाणपत्र हा पर्याय निवडा. (किंवा Search Bar मध्ये income certificate शोधावे.)
  5. पुढे जाऊन ‘सर्व्हिस लिस्ट’ पर्याय निवडा व त्यात ‘मिळकतीचे प्रमाणपत्र’ पर्याय निवडा. (Dashboard या पर्यायामध्ये आपण केलेले अर्ज , त्यांची सद्यस्थिती व मंजूर अर्ज पहावयास मिळतात.)
  6. ‘पुढे जा’ पर्यायावर क्लिक करा व तेथे सांगितल्या प्रमाणे फॉर्म भरा व कागदपत्रे उपलोड करा. १ ते १५ दिवसांत आपल्या दाखल्यास तहसील कार्यालयातून मंजुरी मिळेल.

अधिकृत शासकिय संकेतस्थळ : aaplesarkar.mahaonline.gov.in


Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top