mahaed.com

Digital Satbara utara कसा काढावा ?

Share

Digital Satbara utara कसा काढावा ?

अनुक्रमणिका

तलाठी कार्यालयात उतारे घेण्यासाठी शेतकऱ्यांना हेलपाटे मारावे लागू नये त्यांचा वेळ वाचावा यासाठी महाराष्ट्र शासनाने डिजिटल स्वाक्षरीत ७/१२, ८अ उतारे व फेरफार उपलब्ध करून दिले आहेत. Digital Satbara , ८ अ  व फेरफार सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येतात. घरबसल्या आपण आपल्या जमिनीचे उतारे कसे काढायचे ते या लेखात पाहू.

https://digitalsatbara.mahabhumi.gov.in/dslr शासनाची Digital Utare , ८अ, फेरफार काढण्यासाठी अधिकृत website आहे.

Digital Satbara –

सर्व शासकीय व कायदेशीर बाबींसाठी वापरता येतात. प्रत्येक उतारा काढण्यासाठी १५ रु. आकारले जातात.

Digital Satbara आपल्याला २ प्रकारे काढता येतो – 

  • Regular Login – 

       Login ID, Password टाकून आपण Login करू शकता. आपला  Login ID, Password तयार करण्यासाठी New User Registration या पर्यायावर जाऊन आपला  Login ID, Password तयार करू शकता. 

  • OTP Based Login – 

या पर्यायाचा वापर करत असताना वापरकर्ता नोंदणीची आवश्यकता नाही. स्वतःचा mobile number टाकून OTP मिळवा आणि login करा. 

टिप – Regular login व OTP Based login यांचे वॉलेट वेगवेगळे आहेत. त्यामुळे दोघांचे वॉलेट बँलेस वेगवेगळे आहेत. एका Login मधील रक्कम दुसऱ्या Login मध्ये वापरता येणार नाही.

  • Digitally Signed 7/12 या पर्यायावर जा.
  • जिल्हा निवडा 
  • तालुका निवडा 
  • गाव निवडा 
  • अंकित सातबारा पर्याय निवडा 
  • गट नंबर शोधा 
  • गट नंबर निवडा
  • Downlod या पर्यायावर Click करा सातबारा उतारा Download होईल. Download झाल्यानंतर वॉलेट मधुन १५ रुपये कट होतील.
  • Digitally Signed 8A या पर्यायावर जा.
  • जिल्हा निवडा 
  • तालुका निवडा 
  • गाव निवडा 
  • खाता नंबर टाका 
  • Downlod या पर्यायावर Click करा ८अ उतारा Download होईल. Download झाल्यानंतर वॉलेट मधुन १५ रुपये कट होतील.
  • Digitally Signed eFerfar या पर्यायावर जा.
  • जिल्हा निवडा 
  • तालुका निवडा 
  • गाव निवडा 
  • फेरफार नंबर भरा
  • Downlod या पर्यायावर Click करा फेरफार Download होईल. Download झाल्यानंतर वॉलेट मधुन १५ रुपये कट होतील.

जुने फेरफार येथे मिळतात.

  • Digitally Signed eRecords या पर्यायावर जा.
  • कार्यालय निवडा (तहसिलदार कार्यालय )
  • जिल्हा निवडा 
  • तालुका निवडा 
  • गाव निवडा 
  • दस्तेवज निवडा (फेरफार)
  • फेरफार नंबर भरा
  • शोधा

Unsigned File (View) पर्यायात पाहण्यासाठी मोफत फेरफार मिळतील.

Digitally Signed (Download)  या पर्यायामध्ये शासकीय कामासाठी फेरफार हवा असल्यास मिळेल, व त्यासाठी ३० रुपये आकारले जातात. 

  • All
  • Government Schemes
  • Student
  • Uncategorised

Share

1 thought on “Digital Satbara utara कसा काढावा ?”

  1. Pingback: Pradhan Mantri Kisan Sanman Nidhi Yojana - अर्ज कसा करावा ?

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top