अनुक्रमणिका
प्रस्तावना :
महाराष्ट्र राज्यातील सर्व ग्रामस्थांना प्रशासनाद्वारे पारदर्शक, गतिमान सेवा पुरविणे ही पंचायती राज संस्थांची जबाबदारी आहे. नागरिकांना दैनंदिन जीवनामध्ये सातत्याने आवश्यक असणाऱ्या, ज्या लोकसेवांचा जास्तीत जास्त नागरिकांनी लाभ घेतला आहे , व ज्या लोकसेवा महत्वाच्या आहेत अशा लोकसेवांची निश्चिती केली आहे. या सेवा तत्परतेने व दर्जेदारपणे पुरविण्यासाठी दिनांक २८ एप्रिल, २०१५ रोजी महाराष्ट्र शासनाने “ महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५” लागू केला. सदरील लेखात आपण ग्रामपंचायत स्तरावर दिल्या जाणाऱ्या एकुण १३ सेवांसाठी अर्ज कसा करावा ? त्यासाठी कागदपत्रे कोणती लागतील ? कुणाकडे अर्ज करावा ? याबद्दल माहिती घेणार आहोत. तसेच grampanchayat dakhale, arj namune PDF, Word मध्ये दिले आहेत.
शासन निर्णय :
- ग्रामपंचायत स्तरावर आवश्यक असणाऱ्या एकुण १३ सेवा अधिसूचित करण्यात आल्या.
- सदरील सेवा उपलब्ध करून देताना राज्यात सर्व ठिकाणी एकसूत्रता व समानता राहावी यासाठी अर्जाचे नमुणे, दाखल्याचे नमुणे विहित करण्यात आले आहेत. ग्रामापंचायतीना सदरील नमुन्यांमध्ये कोणताही बदल करता येणार नाही.
- अधिसूचित केलेल्या सेवा पदनिर्देशित केलेल्या अधिकाऱ्याने विहित कालमर्यादेत उपलब्ध करून न दिल्यास अपिल करण्याचा अधिकार आहे.
- ज्या ग्रामापंचायातींकडे अधिसूचित सेवा देण्यासाठी ऑनलाईन कार्यप्रणाली कार्यान्वित असेल, तेथे संगणकीकृत प्रतिंद्वारे दाखले देण्यात यावेत. व ज्या ग्रामापंचायातींकडे ऑनलाईन कार्यप्रणाली कार्यान्वित नसेल त्यांनी सदरील सेवा विहित नमुन्यांमध्ये उपलब्ध करून देणे बंधनकारक राहील.
अधिक माहितीसाठी सोबतचा GR पहा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम – २०१५ दिनांक – १४ जुलै, २०१५.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५ नुसार दाखला / प्रमाणपत्र यांचे नमुने : Grampanchayat Dakhale, Arj Namune PDF, Word
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५ च्या कलम ३ अन्वये ग्रामापंचायातीमार्फत द्यावयाच्या लोकसेवांचा तपशील
अ.क्र. | सेवा | सेवा पुरविण्यासाठी विहित कालावधी | पदनिर्देशित अधिकारी | प्रथम अपिलीय अधिकारी | द्वितीय अपिलीय अधिकारी | सेवा उपलब्धतेसाठी अर्ज सादर करावयाचे ठिकाण | सेवा पुरविण्यासाठी अर्जासोबत भरावयाची फी (रु.) | विहित कालावधीनंतर सेवा कोणत्या ठिकाणावरून उपलब्ध होणार |
---|---|---|---|---|---|---|---|---|
१ | जन्म नोंद दाखला | ५ दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | २०/- | ग्रामपंचायत कार्यालय |
२ | मृत्यु नोंद दाखला | ५ दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | २०/- | ग्रामपंचायत कार्यालय |
३ | विवाह नोंद दाखला | ५ दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | २०/- | ग्रामपंचायत कार्यालय |
४ | रहिवाशी दाखला | ५ दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | २०/- | ग्रामपंचायत कार्यालय |
५ | दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला | ५ दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | मोफत | ग्रामपंचायत कार्यालय |
६ | हयातीचा दाखला | ५ दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | मोफत | ग्रामपंचायत कार्यालय |
७ | ग्रामपंचायत येणे बाकी दाखला | ५ दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | २०/- | ग्रामपंचायत कार्यालय |
८ | शौचालयाचा दाखला | ५ दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | २०/- | ग्रामपंचायत कार्यालय |
९ | नमुना ८ चा उतारा | ५ दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | २०/- | ग्रामपंचायत कार्यालय |
१० | निराधार असल्याचा दाखला | २० दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | मोफत | ग्रामपंचायत कार्यालय |
११ | विधवा असल्याचा दाखला | २० दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | २०/- | ग्रामपंचायत कार्यालय |
१२ | परित्यक्ता असल्याचा दाखला | २० दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | २०/- | ग्रामपंचायत कार्यालय |
१३ | विभक्त कुटुंबाचा दाखला | २० दिवस | ग्रामसेवक | ABDO | BDO | ग्रामपंचायत कार्यालय | २०/- | ग्रामपंचायत कार्यालय |
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५ दाखला / प्रमाणपत्र मिळणेकरीता अर्जासोबत जोडावयाची कागदपत्रे
येथे संबंधित सेवा मिळवण्यासाठी कोणती कागदपत्रे अवश्यक आहेत याबद्दल माहिती मिळेल.अ.क्र. | सेवा | अर्जासोबत द्यावयाचे कागदपत्रे |
---|---|---|
१ | जन्म नोंद दाखला | आवश्यकता नाही |
२ | मृत्यु नोंद दाखला | आवश्यकता नाही |
३ | विवाह नोंद दाखला | आवश्यकता नाही |
४ | रहिवाशी दाखला | १.वीज देयक २. आधार कार्ड ३. मतदार ओळखपत्र ४. रेशन कार्ड ५. घरपट्टी ६. भाडे करार (वरील पैकी कोणताही एक पुरावा सदर करावा ) |
५ | दारिद्र्य रेषेखाली असल्याचा दाखला | आवश्यकता नाही |
६ | हयातीचा दाखला | १. आधार कार्ड २. मतदार ओळखपत्र ३. वाहन चालविण्याचा परवाना ४. पारपत्र ५. पॅनकार्ड ६. छायाचित्र असलेले कोणतेही शासकीय ओळखपत्र (वरील पैकी कोणताही एक पुरावा सदर करावा ) |
७ | ग्रामपंचायत येणे बाकी दाखला | आवश्यकता नाही |
८ | शौचालयाचा दाखला | आवश्यकता नाही |
९ | नमुना ८ चा उतारा | आवश्यकता नाही |
१० | निराधार असल्याचा दाखला | कुटुंब प्रमुखाचा मृत्यु दाखला |
११ | विधवा असल्याचा दाखला | पतीच्या मृत्यूचा दाखला |
१२ | परित्यक्ता असल्याचा दाखला | मा. न्यायालयाचे आदेशाची प्रत (असल्यास उपलब्ध करावी) |
१३ | विभक्त कुटुंबाचा दाखला | आवश्यकता नाही |
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अध्यादेश -२०१५ मधील बंद करण्यात आलेल्या लोकसेवा - स्वयंघोषणापत्र नमुने
नागरिकांच्या सोयीसाठी महाराष्ट्र शासनाने सदरील सेवा बंद करून त्याबद्दल फक्त स्वयंघोषणापत्र स्वीकारण्यात यावे असे निर्देश दिले आहेत. मी लाभार्थ्यांच्या सोयीसाठी pdf व word file यांचा नमुना सोबत देत आहे. नमुना बनवत असताना शासनाच्या मार्दगर्शक सूचनांचे पालन केले आहे.टिप : सोबत जोडण्यात आलेले स्वयंघोषणापत्रांचे नमुने वापरकर्त्याने संबंधीत अधिकाऱ्यांशी चौकशी करूनच वापरावेत.
अधिक माहितीसाठी सोबतचा GR पहा : महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम – २०१५ दिनांक – १३ फेब्रु, २०१९.
अधिक वाचा :
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम – २०१५ बाबत माहितीसाठी शासनाचे अधिकृत संकेतस्थळ पाहण्यासाठी येथे क्लिक करा.
महाराष्ट्र लोकसेवा हक्क अधिनियम – २०१५ बाबत नेहमी विचारले जाणारे प्रश्न : FAQ
Pingback: Mofat Ganvesh Yojana : मोफत गणवेश योजना !
Pingback: Income Certificate: उत्पन्न दाखला कसा काढायचा ?