mahaed.com

Caste Validity Certificate: जातवैधता प्रमाणपत्र विषयी संपूर्ण माहिती

Share

caste validity document list
Credit: www.mahaed.com

अनुक्रमणिका

प्रस्तावना

सदरील लेखात आपण जात पडताळणी साठी कोण कोणते कागदपत्रे लागतात? जातपडताळणी प्रमाणपत्र कसे काढावे? तसेच जातपडताळणी करण्यासाठी अर्ज करताना जे शपथपत्र पाहिजेत त्या शपथत्राचे नमुने word file format मध्ये देत आहोत.

Caste Validity Certificate चे महत्व :

  1. जात पडताळणी प्रमाणपत्र धारकाला राज्यघटनेने दिलेल्या आरक्षणाचा लाभ मिळतो. अनु. जाती (SC), अनु. जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC), विमुक्त जाती (VJ), भटक्या जमाती (NT) इ. समाजातील लोकांना शिक्षण, नोकरी, निवडणूक यात लोकसंखेच्या प्रमाणात योग्य प्रतिनिधित्व मिळावे म्हणून आरक्षणाची तरतूद राज्यघटनेत केलेली आहे. शासनामार्फत राबवल्या जाणाऱ्या कल्याणकारी योजनांचा लाभ मिळवायचा असेल तर जात पडताळणी प्रमाणपत्र असणे बंधनकारक आहे. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत जात वैधता प्रमाणपत्र आपल्याला मिळते.
  2. खालील कारणांसाठी जातवैधता प्रमाणपत्र काढता येते:
    • शिक्षण
    • निवडणूक
    • नोकरी
    • इतर

व्याख्या: Definition of Caste Validity Certificate

एखादा व्यक्तीला जन्मानंतर त्याच्या वडीलांची जात मिळते. संबंधित जातीचे प्रमाणपत्र त्या व्यक्तीला उपविभागीय अधिकारी कार्यालयातून काढता येते. शिक्षण, निवडणूक, नोकरी व इतर क्षेत्रात उपलब्ध असणार्‍या आरक्षणाचा लाभ घेण्यासाठी जात वैधता प्रमाणपत्र आवश्यक असते. लाभार्थीच्या जातीच्या दाखल्याची वैधता शैक्षणिक व महसूली पुराव्यांच्या आधारे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत तपासली जाते. सदरील प्रमाणपत्र वैध आढळून आल्यास लाभार्थ्याला जातवैधता प्रमाणपत्र दिले जाते.

कायदेशीर महत्व: Legal Importance of Caste Validity Certificate

एखाद्या व्यक्तीची जात कुठली हे निश्चित करण्यासाठी शासनाने काही नियम घालून दिलेले आहेत. जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती सदरील नियमानुसार शालेय पुरावे आणि महसुली पुरावे यांच्या आधारे व्यक्तीचे जात प्रमाणपत्र वैध किंवा अवैध ठरवत असते. जात प्रमाणपत्र वैध असेल तरच शासनाच्या जाती निहाय आरक्षणाचा लाभ घेता येतो.

जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठीची पात्रता:

जातीचा दाखला आहे अशा प्रत्येकालाच जातवैधता प्रमाणपत्र पडताळणी साठी अर्ज करता येत नाही. खालील निवडक कारणांसाठीच लाभार्थी जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी पात्र असतो.

  1. शिक्षण : 10 वी किंवा १२ वी चे शिक्षण पूर्ण झाले आहे आणि पुढे त्यांना व्यावसायिक शिक्षण घ्यायचे आहे अशा विद्यार्थ्यांना जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो.
  2. निवडणूक : पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीमध्ये आरक्षित जागेवरून निवडणूक लढवणाऱ्या उमेदवाराला जात वैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी अर्ज करता येतो. अर्थात जो उमेदवार निवडून येतो अशाच उमेदवाराचे प्रकरण जिल्हा जात पडताळणी समिती विचारात घेते.
  3. नोकरी : एखाद्या लाभार्थ्याची निवड आरक्षित जागेवर झाल्यास संबंधित खाते त्या लाभार्थ्याची जात वैधता तपासणी करण्याची मागणी करते. अशावेळी सदरील लाभार्थी जिल्हा जातपडताळणी समितीकडे जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करू शकतो.
  4. इतर :
    • एखाद्या व्यक्तीची निवड gas agency, पेट्रोल पंप चालू करण्यासाठी आरक्षित जागेवर झाली तर त्या व्यक्तीला शासनाच्या शिफारसीने जात वैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो.
    • शासकिय संस्थांमार्फत लोक कल्याणासाठी योजना राबवल्या जातात. या योजनांचा आरक्षित जागेवर लाभ घेतल्यास संबंधित संस्था लाभार्थ्याकडून जात वैधता प्रमाणपत्राची मागणी करतात. अशावेळी लाभार्थी व्यक्तीला जातवैधता प्रमाणपत्रासाठी अर्ज करता येतो.
    • काही न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये जातीच्या वैधतेबद्दल प्रश्न निर्माण झाल्यास मा. न्यायालय संबंधितांची जातवैधता प्रमाणपत्र मिळवण्यासाठी मागणी करतात.

जातवैधता प्रमाणपत्राचे फायदे :

  1. शिक्षण
    • शासनाच्या विविध विभागामार्फत विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती दिली जाते. शिष्यवृत्ती मिळवण्यासाठी विद्यार्थ्याचा जात, प्रवर्ग या गोष्टीही विचारात घेतल्या जातात, म्हणून विद्यार्थ्याचे जातवैधता प्रमाणपत्र बंधनकारक आहे.
    • विद्यार्थ्यांचे परीक्षा शुल्क व शिकवणी शुल्क यामध्ये सुट तसेच काही प्रकरणांत माफीही मिळते.
    • शैक्षणिक संस्थांमध्ये काही प्रमाणात जागा आरक्षित असतात. त्या जागांवर आरक्षित प्रवर्गातून विद्यार्थ्यांना प्रवेश घेण्यासाठी सदरील प्रमाणपत्राचा फायदा होतो.
  2. निवडणूक
    • पंचायत राज संस्थांच्या निवडणुकीमध्ये अनु. जाती (SC), अनु. जमाती (ST), इतर मागासवर्ग प्रवर्ग (OBC), विमुक्त जाती (VJ) , भटक्या जमाती (NT) व विशेष मागास प्रवर्गातील लोकांना पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे म्हणून लोकसंखेच्या प्रमाणात काही जागा आरक्षित ठेवल्या जातात. या जागांवर निवडणूक लढवण्यासाठी उमेदवाराकडे जात पडताळणी प्रमाणपत्र अवश्यक असते. उदा. ग्रामपंचायत, पंचायत समिती, जिल्हा परिषद इत्यादी निवडणुका.
  3. नोकरी
    • समाजातील सर्व घटकांना नोकरीत पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे, सर्वांना विकासाची समान संधी मिळावी यासाठी नोकरीत आरक्षण दिले गेले आहे.
    • आरक्षित प्रवर्गाला राखीव जागेवर नोकरीत भारती होण्यासाठी व
    • आरक्षित प्रवर्गातून बढती (promotion) मिळवण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्राची गरज असते.
  4. इतर
    • Gas agency, petrol pump retail outlet सुरू करण्यासाठी आरक्षित जागा असतात. सदरील licenses घ्यायचे असल्यास जातवैधता प्रमाणपत्राची पडताळणी करून घ्यावी लागते.
    • शासनाच्या MHADA, CIDCO/HUDCO या संस्थांच्या मार्फत राबवल्या जाणाऱ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी सदरील प्रमाणपत्राची गरज असते.
    • न्यायप्रविष्ठ प्रकरणांमध्ये जातीच्या वैधतेबद्दल प्रश्न निर्माण झाल्यास जातवैधता प्रमाणपत्र फायदेशीर ठरते.

 

जातवैधता प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक कागदपत्रे :

  • जातपडताळणी कागदपत्रे:

जातपडताळणी कोणत्या कारणासाठी करायची आहे? त्यानुसार कोणती जातपडताळणी कागदपत्रे आवश्यक असतील यासाठी शासनाने नियम घालून दिलेले आहेत. जातीच्या पुराव्यांसाठी सर्व प्रकरणामध्ये सारखेच शैक्षणिक किंवा महसुली पुरावे सादर करावे लागतात. अर्ज, शपथपत्र व शिफारस पत्र प्रकरणानुसार वेगळे असतात. अर्ज, शपथपत्र व शिफारस पत्र कोणत्या कारणासाठी कसे असावे याचे नमुने शासनाने दिले आहेत. सर्व नमुने editable word file स्वरुपात या लेखात देत आहोत.

अ. विद्यार्थी प्रकरण

  1. चेकलिस्ट (Covering Letter for Caste Validity)
  2. अर्जदाराचा पासपोर्ट आकाराचा फोटो.
  3. अर्जदाराचा व त्याच्या पालकांचा सहीचा फोटो.
  4. कॉलेजचे शिफारस पत्र व बोनाफाईड प्रमाणपत्र.
  5. नमुना नं. १६ चा नियम १४ ची ऑनलाइन भरलेल्या फॉर्म ची प्रत.
  6. नमुना नं. 15A फॉर्म (Issued by Principal of the School/College)
  7. जातीचा दाखला. (उपविभागीय अधिकारी यांचेकडून मिळालेला – सत्यप्रत)
  8. नमुना नं. ३ चे मूळ शपथपत्र रुपये १०० च्या स्टँप पेपरवर. (वंशावळीचे शपथपत्र.)
  9. नमुना नं. १७ चे मूळ शपथपत्र रुपये १०० च्या स्टँप पेपरवर.
  10. अर्जदाराचा स्वत:चा प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा मूळ प्रमाणित प्रत किंवा अर्जदाराचा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत.
  11. अर्जदाराचे वडील शिक्षित असल्यास वडीलांचा प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा मूळ प्रमाणित प्रत किंवा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत.
  12. अर्जदाराचे वडील अशिक्षित असल्यास वडील अशिक्षित असलेबाबतचे शपथपत्र. (मूळप्रत सादर करावी.)
  13. अर्जदाराचे चुलते अथवा आत्या यांचा प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा मूळ प्रमाणित प्रत किंवा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत.
  14. अर्जदाराचे आजोबा, आजोबांचे भाऊ अथवा आजोबांची बहीण यांचा प्राथमिक शाळेचा प्रवेश निर्गम उतारा मूळ प्रमाणित प्रत किंवा प्राथमिक शाळेचा शाळा सोडल्याचा दाखल्याची साक्षांकित प्रत.
  15. उपलब्ध असल्यास वडीलांच्या बाजूचे रक्ताच्या नात्यातील व्यक्तीचे Caste Validity Certificate ची साक्षांकीत प्रत सादर करावी. (बंधनकारक नाही.)
  16.  

टीप

  • अनुसुचित जाती (SC) किंवा अनुसूचित जमाती (ST) यांचेसाठी – जातीचा पुरावा १० ऑगस्ट १९५० पूर्वीचा असावा.
  • विमुक्त जाती (VJ) किंवा भटक्या जमाती (NT) यांचेसाठी जातीचा पुरावा २१ नोव्हेंबर १९६१ पूर्वीचा ग्राह्य धरला जातो.
  • इतर मागास वर्ग (OBC) व विशेष मागास वर्गासाठी (SBC) १३ ऑक्टोबर १९६७ पूर्वीचा पुरावा ग्राह्य धरला जातो.
  • कुणबी प्रकरणासाठी
      • गाव नमुना नं. १४ ची तहसीलदार यांचेकडून प्राप्त केलेली मूळ प्रमाणित प्रत सादर करावी.
      • गाव नमुना नं. १४ हा मोडी लिपीत असल्यास त्याचे मराठीत लिप्यंतर केलेली मूळ प्रत सादर करावी.
      • मोडी लिपीतील पुराव्यांचे मराठी लिप्यंतर करणाऱ्या व्यक्तीचे मूळ शपथपत्र सादर करावे.
      • गाव नमुना नं. १४ मध्ये ज्या व्यक्तीचे नाव आहे, त्यांचेशी नाते सिद्ध करण्याकरिता पूरक पुरावे मूळ प्रतीत सादर करावेत. उदा. जमिनीचे फेरफार, क ड इ पत्रक इ.

ब. निवडणूक :

क. नोकरी :

ड. इतर :

(महत्वाचेजातीचा पुरावा म्हणून वर उल्लेख केलेल्या तारखांच्या आधीचा जन्म किंवा मृत्यु झाला आहे अशा व्यक्तीच्या जन्म किंवा मृत्यु दाखला (गा.न.नं. १४ ची प्रत) किंवा शाळा सोडल्याचा दाखला किंवा प्रवेश निर्गम उतारा यापैकी एक दाखला सदर करावा. त्या दाखल्यात जातीचा स्पष्ट उल्लेख असावा. वडील किंवा आजोबा इ. व्यतिरिक्त चुलते, आत्या, आजोबांचे भाऊ, किंवा आजोबांच्या भावांचे वारस यापैकी जर पुरावा सादर करत असाल तर त्यांचे तुमच्याशी असणारे नाते सिद्ध करता येणारे पुरावे (वारस फेर) सादर करणे बंधनकारक आहे.)

अर्ज कसा करावा?

  1. जात प्रमाणपत्र पडताळणी साठीच्या अधिकृत संकेतस्थळावर जा.
  2. New user register here येथे जा. विचारलेली माहिती व्यवस्थित भरा.
  3. Username – तुम्ही दिलेला इ-मेल असेल. तर password तुम्हाला हवा तो तयार करा.
  4. Submit केल्यानंतर संकेतस्थळावर तुमचे यशस्वीरीत्या खाते तयार होईल.
  5. तुम्ही दिलेल्या इ-मेल वर संकेतस्थळावरून एक मेल येईल त्याचे verification केल्यानंतरच तुम्हाला login करता येईल.
  6. Login केल्यावर जशा सूचना केल्या आहेत त्याप्रमाणे अर्ज पूर्ण भरून घ्या. कागदपत्रे उपलोड करा. मग शुल्क भरण्यास सांगीतले जाईल. (उदा. शिक्षणासाठी शुल्क १०० रुपये असते.) शुल्क भरून झाल्यावर तुमचा अर्ज यशस्वीपणे झाला आहे समजा.
  7. मग भरलेल्या अर्जाची प्रत व शुल्क भरल्याची पावती कागदपत्रांच्या सोबत जोडावी. ही संपूर्ण संचिका संबंधित जिल्ह्याच्या ठिकाणी असणाऱ्या जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती कार्यालयात स्वहस्ते जमा करावी.
  8. अर्ज केल्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत ३ महिन्याच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र देते. काही अपवादा‍त्मक प्रकरणांमध्ये समितीला निर्णय देण्यासाठी आणखी २ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.
  9. प्रकरणात काही त्रुटी असतील तर, इ-मेल व मेसेज द्वारे लाभार्थ्याला कळवले जाते व आवश्यक कागदपत्रांची मागणी केली जाते. जात पडताळणी त्रुटी पूर्तता अर्ज सविस्तर खुलासा करून भरावा, व मागितलेली कागदपत्रे सोबत जोडून समितीकडे कार्यालयात जाऊन सादर करावा.
  10. १० वी किंवा १२ वी चे शिक्षण पूर्ण झाले आहे अशा विद्यार्थ्यांना काही कारणास्तव जातवैधता प्रमाणपत्रास अर्ज करण्यास उशीर झाल्यास ऐनवेळी प्रवेश घेण्याआगोदर प्रवेश परीक्षेचा निकाल किंवा प्रवेशपत्र संचीकेसोबत जोडून द्यावे. प्रवेश दिनांकापर्यंत तातडीने जातवैधता प्रमाणपत्र दिले जाते. त्यासाठी कोणाचीही मध्यस्थी स्वीकारू नये, पैशांचा व्यवहार करू नये अशा स्पष्ट सूचना जिल्हा जात पडताळणी समिती मार्फत दिल्या आहेत. उशिराने जातवैधता प्रमाणपत्रास अर्ज करतेवेळी हमीपत्र  भरून देणे बंधनकारक आहे.

टिप: अर्ज भरून झाल्यानंतर संपूर्ण संचिका कार्यालयाने सांगितलेल्या चेकलीस्ट नुसार जोडावी. चेकलीस्ट चा नमुना (word file format) सोबत देत आहोत.

जातवैधता प्रमाणपत्राची सत्यता तपासण्याची पद्धत:

दाखला मिळाल्यानंतर त्याची सत्यता तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावर Verify Validity Certificate असा पर्याय दिला आहे. येथे जात वैधता प्रमाणपत्र क्रमांक टाकून पडताळणी करू शकता. (जातवैधता प्रमाणपत्र क्रमांक हा प्रमाणपत्राच्या उजव्या बाजूला वरच्या कोपर्‍यात बारकोड च्या खाली लिहिला जातो. VC No.: year-xxxxxx असा दिलेला असतो.)

वैधता व नूतनीकरण :

जातवैधता प्रमाणपत्राची वैधता कायमस्वरूपी असते. त्याला पुन्हा नव्याने काढण्याची गरज नसते.

निष्कर्ष :

अनु. जाती (SC), अनु. जमाती (ST), इतर मागासवर्गीय (OBC) या समाजातील लोकांना शिक्षणाच्या सोयी उपलब्ध व्हाव्यात, त्यांच्यावर आर्थिक ताण वाढू नये, नोकरीत व निवडणूक प्रक्रियेत पुरेसे प्रतिनिधित्व मिळावे यासाठी भारतीय राज्यघटनेने यांना आरक्षण दिले आहे. या आरक्षणाचा लाभ घ्यायचा असल्यास लाभार्थ्याकडे स्वत:चा जातीचा दाखला आणि जात पडताळणी दाखला दोन्ही आवश्यक आहे. जात पडताळणी दाखला कसा काढायचा ? याविषयी आपण सविस्तर माहिती सदरील लेखात घेतलीच आहे. जातपडताळणी प्रमाणपत्र स्वत: , कोणालाही मध्यस्थी न घेता, कोणाशीही पैशांचा व्यवहार न करता मिळवू शकता. आपण यास पात्र असाल तर आजच जात पडताळणी दाखला काढून घ्या. धन्यवाद.

संपर्क :

  • Email – helpdesk@barti.in
  • Helpline Toll Free Number (24*7): 1800 120 8040
  • Whats App Complaint Number: 9404999452 / 9404999453

याव्यतिरिक्त अधिकृत संकेतस्थळावर जिल्हा निहाय आणखी संपर्क पर्याय दिले आहेत.

जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी आवश्यक हमीपत्र नमुने :

Frequently Asked Questions (FAQs)

  • जात पडताळणी म्हणजे काय ?

विविध शासकीय लाभ मिळवण्यासाठी आपला जातीचा दाखला जिल्हा जात पडताळणी समितीमार्फत तपासला जातो व संबंधिताना जातवैधता प्रमाणपत्र दिले जाते.

  • जात पडताळणी किती दिवसात मिळते ?

अर्ज केल्यानंतर जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत ३ महिन्याच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र देते. काही अपवादा‍त्मक प्रकरणांमध्ये समितीला निर्णय देण्यासाठी आणखी २ महिन्यांचा कालावधी लागू शकतो.

  • प्रवेश निर्गम उतारा कसा काढावा?

प्राथमिक शाळेतून विद्यार्थ्याचा प्रवेश निर्गम उतारा दिला जातो. ज्या प्राथमिक शाळेत शिक्षण झाले आहे, तेथे अर्ज करणे आवश्यक आहे. शाळेच्या विकासासाठी ठराविक शुल्क घेऊन हा दाखला दिला जातो.

  • जातीची नोंद असणारे महसुली पुरावे कसे काढावे?

    • Digitally signed satbara या अधिकृत संकेतस्थळावर जा.
    • खातेदार असाल तर Regular Login हा पर्याय वापरा. (स्वतःचे येथे खाते तयार करू शकता.)
    • OTP Based Login हा पर्याय सुद्धा वापरू शकता. यासाठी खातेदार असण्याची आवश्यकता नाही. दोन्ही Login पर्यायांचे Wallet वेगळे असते. सहीचे उतारे, फेर, जन्म-मृत्यूचे दाखले काढायचे असल्यास याच wallet मधून चलन कट होते. त्यासाठी wallet मध्ये अगोदर पैसे भरावे लागतात.
    • Login केल्यावर Digitally signed eRecords या पर्यायावर जा.
    • तहसील कार्यालय निवडून आपला जिल्हा-तालुका-गाव निवडा.
    • दस्तऐवज प्रकारात जन्म मृत्यु हा पर्याय निवडावा.
    • ज्या वर्षीचा जातीची नोंद म्हणजेच जन्म-मृत्यूचे दाखले काढायचे आहेत ते वर्ष टाकून शोधा. (फक्त पाहण्यासाठी स्वक्षरीविरहित दाखले मोफत काढता येतात. तर सरकारी कामकाजासाठी डिजीटल स्वाक्षरीचे दाखले ३० रुपये चलन भरून काढू शकतात.)
  • वारस फेर कसे काढावेत?

    • Digitally signed satbara या अधिकृत संकेतस्थळावर जा.
    • खातेदार असाल तर Regular Login हा पर्याय वापरा. (स्वतःचे येथे खाते तयार करू शकता.)
    • OTP Based Login हा पर्याय सुद्धा वापरू शकता. यासाठी खातेदार असण्याची आवश्यकता नाही. दोन्ही Login पर्यायांचे Wallet वेगळे असते. सहीचे उतारे, फेर, जन्म-मृत्यूचे दाखले काढायचे असल्यास याच wallet मधून चलन कट होते. त्यासाठी wallet मध्ये अगोदर पैसे भरावे लागतात.
    • Login केल्यावर जुने फेरफार काढण्यासाठी Digitally signed eRecords या पर्यायावर जा.
    • तहसील कार्यालय निवडून आपला जिल्हा-तालुका-गाव निवडा.
    • दस्तऐवज प्रकारात फेरफार हा पर्याय निवडावा.
    • गट नंबर / फेर नंबर / सर्व्हे नंबर वापरून आपल्याला हवे ते फेरफार काढू शकता.  (फक्त पाहण्यासाठी स्वक्षरीविरहित फेरफार मोफत काढता येतात. तर सरकारी कामकाजासाठी डिजीटल स्वाक्षरीचे फेरफार ३० रुपये चलन भरून काढू शकतात.)
    • नवीन फेरफार काढण्यासाठी Digitally Signed eFerfar हा पर्याय निवडावा.
    • जिल्हा – तालुका – गाव – फेरफार नंबर टाकुन नवीन फेरफार शोधावे.

Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top