mahaed.com

PM Internship Scheme 2024: पात्रता, लाभ इ. बद्दल सविस्तर माहिती

Share

pm internship scheme
Image Source - www.mahaed.com

अनुक्रमणिका

प्रस्तावना:

PM Internship Scheme योजनेची घोषणा २०२४-२०२५ च्या वार्षिक अर्थसंकल्पात केली होती. सरकार देशातील १ कोटी युवकांना देशातल्या ५०० कंपनी मध्ये पुढील ५ वर्षांसाठी इंटर्नशिप ची संधी देत आहे. या योजनेत युवकांना १२ महिन्यांसाठी विविध क्षेत्रातील कार्यरत कंपन्यांसोबत प्रत्यक्षरित्या काम करण्याचा अनुभव व स्वतः ची कौशल्ये विकसित करण्याची संधी मिळेल. पुस्तकी ज्ञान आणि प्रत्यक्ष कामातील फरक युवकांना कळावा ही उद्दिष्ट्ये डोळ्यासमोर ठेऊन योजनेस सुरुवात केली आहे. सुरुवातीला २०२४-२५ या आर्थिक वर्षात प्रायोगिक तत्वावर १.२५ लाख इंटर्नशिप च्या संधी उपलब्ध करून देण्यात येणार आहेत. यासाठी देशातील ५०० महत्वाच्या कंपन्यांची निवड केली आहे. यामुळे युवकांची नोकरी मिळवण्याची योग्यता वाढेल. सदरील लेखात आपण pm internship scheme 2024 साठी आवश्यक पात्रता (Eligibility), अर्ज नोंदणी (Registration), संधी (opportunities) याबद्दल सविस्तर माहिती पाहणार आहोत.

पात्रता : PM Internship Scheme Eligibility

  • २१ ते २४ वयोगटातील अर्जदार पात्र असतील. (अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशीचे वय ग्राह्य धरले जाईल)
  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदार पूर्ण वेळ विद्यार्थी किंवा पूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा.
  • मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणारे किंवा online शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.

अपात्रता : PM Internship Scheme Ineligibility

  • IIT, IIM, IISER, NID, IIIT, National Law Universities येथून शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी योजनेसाठी अपात्र आहेत.
  • CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA, तसेच कोणत्याही प्रकारची पदवीनंतरची पदवी (any master’s degree or higher degree) प्राप्त युवा योजनेसाठी अपात्र असतील.
  • केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर skill development, apprenticeship, internship किंवा student training program मध्ये भाग घेतलेले अपात्र असतील.
  • NATS – National Apprenticeship Training Scheme किंवा NAPS – National Apprenticeship Promotion Scheme चा लाभ घेतलेले अपात्र असतील.
  • २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८ लाख रूपयांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असणारे अपात्र असतील.
  • शासकिय नोकरीत असणार्‍या कुटुंबातील सदस्य अपात्र असतील. (Contractual करार पद्धतीने नोकरीत असणारे किंवा त्यांचे कुटुंबिय यास अपवाद असतील.)

पीएम इंटर्नशिप योजनेचे फायदे : PM Internship Scheme Benefits

  • ही योजना DBT (Direct Benefit Scheme) आहे. लाभार्थींना दर महिन्याला ५००० रुपये प्रमाणे एकूण १२ महिन्यांसाठी मदत दिली जाईल.
    • यातील ५०० रुपये प्रत्येक प्रशिक्षणार्थीला कंपनी मार्फत त्यांच्या नियमानुसार CSR funds मधून देईल. ज्या वेळी कंपनी ५०० रुपये लाभार्थ्याच्या खात्यात टाकेल तेव्हा शासन ४५०० रुपये लाभार्थ्याच्या खात्यात DBT प्रणाली द्वारे वर्ग करील. (यासाठी आधार कार्ड व बँक खाते NPCI लिंक असावे लागते.) याव्यतिरिक्त एखाद्या कंपनीला लाभार्थ्याला ५०० किंवा ५०० रूपयांपेक्षा जास्त रक्कम द्यायची असेल तर ते स्वत:च्या funds मधून देऊ शकतात.
  • लाभार्थ्याने कंपनीचा इंटर्नशिप प्रस्ताव स्वीकारल्यावर कंपनी याची माहिती पोर्टल वर देईल मग प्रासंगिक अनुदान म्हणून प्रशिक्षणार्थी इंटर्नशिप साठी रुजू झाल्यावर एकदाच ६००० हजार रुपये शासन DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्याला देईल.
  • नियमानुसार लाभार्थ्याच्या प्रशिक्षणाचा सर्व खर्च कंपनी स्वतःच्या CSR फंड्स  मधून करेल.
  • प्रत्येक लाभार्थ्याचा ‘ प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना’ आणि ‘ प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना’ योजनेंतर्गत विमा उतरवला जाईल. सदरील दोन्ही विमा योजनांचा हप्ता शासन भरेल.
  • लाभार्थ्याचा अपघाती विमा कंपनीमार्फत केला जाऊ शकतो.

पीएम इंटर्नशिप योजना कशी राबवली जाईल?

  • PM Internship Portal (mca.gov.in) या अधिकृत संकेतस्थळावरून सर्व कार्यपद्धती राबवली जाईल.
  • संकेतस्थळावर कंपन्यांसाठी इंटर्नशिप च्या संधी, इंटर्नशिप चा प्रकार, इंटर्नशिप ची जागा, शैक्षणिक पात्रता, कंपनीमार्फत पुरविल्या जाणाऱ्या सुविधा इत्यादी माहिती देण्यासाठी सोय केली जाईल.
  • पात्र लाभार्थ्यांनी संकेतस्थळावर नोंदणी करावी. लाभार्थ्याने दिलेल्या शैक्षणिक व इतर माहितीच्या आधारे संकेतस्थळ लाभार्थ्याचा resume बनवेल. पात्रतेनुसार, आवडीनुसार प्रशिक्षणार्थी ५ जागांसाठी अर्ज करू शकेल.
  • प्रशिक्षणार्थी निवड – संकेतस्थळावरील प्रत्येक इंटर्नशिप संधीसाठी लाभार्थ्यांचा एक गट निवडला जाईल. लाभार्थ्याची निवड त्याने दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार व कंपनीच्या गरजेनुसार केली जाईल. निवड सर्वसमावेशक असेल. अनु.जाती, अनु. जमाती, इतर मागासवर्गीय, अपंगांसह सर्वाना योग्य संधी मिळेल. उपलब्ध संधींच्या २-३ पटीत लाभार्थ्यांची शिफारस शासन कंपनीला करेल. कंपनी त्यांच्या गरजेनुसार , पात्रतेनुसार , पद्धतीनुसार लाभार्थ्यांची निवड करेल. कंपनी लाभार्थ्यांना इंटर्नशिप साठी ऑफर लेटर संकेतस्थळावरून देईल. लाभार्थ्याला एका फेरीत २ इंटर्नशिप ऑफर मिळू शकतात. मग लाभार्थ्याने संकेतस्थळावरून कंपनीला ऑफर लेटर स्वीकारल्याचे कळवावे. ऑफर लेटर स्वीकारल्यावर संकेतस्थळावर आपोआप इंटर्नशिप कागदपत्रे तयार होतील ज्यात कंपनी आणि प्रशिक्षणार्थीचे कर्तव्ये आणि जबाबदाऱ्या याबाबत माहिती असेल.
  • सदरील ऑफर / इंटर्नशिप शासनाकडून किंवा कंपनीकडून कोणत्याही प्रकारची कायम किंवा करार पद्धतीची नोकरी प्रशिक्षणार्थीला देण्याची हमी देत नाही.
  •  

कंपनीची भूमिका व जबाबदारी :

  • प्रशिक्षण यशस्वीरीत्या पूर्ण करणाऱ्या लाभार्थ्यास त्याचे प्रमाणपत्र देईल.
  • कंपनी ज्या कामात असेल ते काम करण्याचा प्रत्यक्ष अनुभव लाभार्थ्यांना देणे अपेक्षित आहे.
  • कंपन्यांनी संबंधित इंटर्नशिप साठी आवश्यक पात्रतेपेक्षा जास्तीच्या पात्रतेची अट ठेऊ नये.
  • कंपन्यांनी अकुशल कामांसाठी इंटर्नशिप देऊ नये जसे की , स्वच्छता कर्मचारी , सुरक्षा रक्षक , ऑफिस बॉय इत्यादी.
  • कंपन्यांनी आपापल्या धोरणानुसार लाभार्थ्यांचे मूल्यमापन करावे. याचा त्रैमासिक अहवाल संकेतस्थळावर सादर करावा.
  • जर प्रशिक्षणार्थी कार्यकाल पूर्ण होण्याअगोदर सोडून गेला तर याची माहिती कंपनीने संकेतस्थळावर द्यावी.

प्रशिक्षणार्थीची भूमिका व जबाबदारी :

  • कंपनीच्या वेळ,शिस्त,नियम व अटींचे पालन करणे.
  • वैद्यकीय आणीबाणी साठी २ महिन्यांपर्यंत कंपनीच्या नियमानुसार किंवा मंत्रालय वेळोवेळी सूचना देईल त्याप्रमाणे सुट्टी घेता येते. या काळात आर्थिक लाभ दिला जाणार नाही. पुन्हा प्रशिक्षणासाठी हजर होता येते व प्रशिक्षण पूर्ण करता येते.
  • जर सुट्टी २ महिन्यांपेक्षा जास्त होत असेल तर प्रशिक्षण थांबवावे लागते व पुन्हा नव्याने अर्ज करावा लागतो.

अर्ज करण्याचा कालावधी : PM Internship Scheme Registration Date

Pm Internship Scheme 2024-25 साठी अर्ज करण्याबद्दल सूचना लवकरच अधिकृतरीत्या संकेतस्थळावर जाहीर केले जाईल. 

अर्ज करण्याची पद्धती :

योजनेचे अधिकृत शासकीय संकेतस्थळ : येथे पहा

संकेतस्थळावर अर्ज करण्यासाठी १२ ऑक्टोबर, २०२४ रोजी सुरुवात झाली आहे.

  • Go to official website
  • Click on youth registration.
  • Enter Mobile Number and Submit. (Aadhar Linked Mobile Number)
  • Enter OTP and Click on Submit.
  • Update Password Screen will open and create password there using temporary password which you received on mobile.
  • सूचना वाचुन त्याप्रमाणे अर्ज पूर्ण भरून घ्या.

पात्रतेनुसार युवकांना मोबईल/इमेल च्या माध्यमातून उपलब्ध संधींची माहिती मिळेल. त्यानंतरच उपलब्ध संधीचा लाभ घेण्यासाठी पर्याय मिळेल.

माहितीचा स्त्रोत:

‘पीएम इंटर्नशिप स्कीम’  योजनेची मार्गदर्शक तत्वे :

Click Here

Frequently Asked Questions:

एखाद्या क्षेत्रातील शिक्षण पूर्ण झाल्यानंतर त्या क्षेत्रात नोकरी करण्या अगोदर त्या क्षेत्रातील कामाचा प्रत्यक्ष अनुभव घेण्यासाठी काही दिवसांचे प्रशिक्षण घेणे म्हणजे इंटर्नशीप होय.

देशातील युवकांना प्रत्यक्ष व्यवसाय करण्याचा अनुभव मिळावा , त्यांचातील कौशल्ये विकसित करावीत व यातूनच त्यांना रोजगारक्षम बनवावे यासाठी भारत सरकारने ‘पीएम इंटर्नशिप स्कीम २०२४’ या योजनेची सुरुवात केली आहे. पुढील ५ वर्षामध्ये देशातील ५०० कंपन्यांच्या माध्यमातून १ कोटी युवकांना रोजगारक्षम बनवण्याचे सरकारचे ध्येय आहे. या योजनेमधून युवकांना १२ महिन्यासाठी कंपनीमध्ये प्रशिक्षण दिले जाईल व या काळात त्या युवकाला प्रति महिना ५००० रुपये रक्कम दिली जाईल.

  • २१ ते २४ वयोगटातील अर्जदार पात्र असतील. (अर्ज करण्याच्या शेवटच्या दिवशीचे वय ग्राह्य धरले जाईल)
  • अर्जदार भारतीय नागरिक असावा.
  • अर्जदार पूर्ण वेळ विद्यार्थी किंवा पूर्ण वेळ नोकरी करणारा नसावा.
  • मुक्त विद्यापीठातून शिक्षण पूर्ण करणारे किंवा online शिक्षण घेणारे विद्यार्थी या योजनेसाठी पात्र असतील.
  • IIT, IIM, IISER, NID, IIIT, National Law Universities येथून शिक्षण पूर्ण केलेले विद्यार्थी योजनेसाठी अपात्र आहेत.
  • CA, CMA, CS, MBBS, BDS, MBA, तसेच कोणत्याही प्रकारची पदवीनंतरची पदवी (any masters degree or higher degree) प्राप्त युवा योजनेसाठी अपात्र असतील.
  • केंद्र किंवा राज्य शासनाच्या इतर skill development, apprenticeship, internship किंवा student training program मध्ये भाग घेतलेले अपात्र असतील.
  • NATS – National Apprenticeship Training Scheme किंवा NAPS – National Apprenticeship Promotion Scheme चा लाभ घेतलेले अपात्र असतील.
  • २०२३-२४ या आर्थिक वर्षात ८ लाख रूपयांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असणारे अपात्र असतील.
  • शासकिय नोकरीत असणार्‍या कुटुंबातील सदस्य अपात्र असतील. (contractual करार पद्धतीने नोकरीत असणारे किंवा त्यांचे कुटुंबिय यास अपवाद असतील.)
  • DBT (Direct Benefit Scheme) नुसार लाभार्थींना दर महिन्याला ५००० रुपये प्रमाणे एकूण १२ महिन्यांसाठी मदत दिली जाईल.
    • यातील ५०० रुपये प्रत्येक प्रशिक्षणार्थीला कंपनी मार्फत त्यांच्या नियमानुसार CSR funds मधून देईल. ज्या वेळी कंपनी ५०० रुपये लाभार्थ्याच्या खात्यात टाकेल तेव्हा शासन ४५०० रुपये लाभार्थ्याच्या खात्यात DBT प्रणाली द्वारे वर्ग करील. (यासाठी आधार कार्ड व बँक खाते NPCI लिंक असावे लागते.) याव्यतिरिक्त एखाद्या कंपनीला लाभार्थ्याला ५०० किंवा ५०० रूपयांपेक्षा जास्त रक्कम द्यायची असेल तर ते स्वत:च्या funds मधून देऊ शकतात.
  • प्रशिक्षणार्थी इंटर्नशिप साठी रुजू झाल्यावर एकदाच ६००० हजार रुपये शासन DBT प्रणालीद्वारे लाभार्थ्याला देईल.
  • प्रत्येक लाभार्थ्याचा ‘ प्रधान मंत्री जीवन ज्योती बिमा योजना’ आणि ‘ प्रधान मंत्री सुरक्षा बिमा योजना’ योजनेंतर्गत विमा उतरवला जाईल. सदरील दोन्ही विमा योजनांचा हप्ता शासन भरेल.
  • लाभार्थ्याचा अपघाती विमा कंपनीमार्फत केला जाऊ शकतो.

होय. आर्थिक वर्षात ८ लाख रूपयांपेक्षा जास्त कौटुंबिक उत्पन्न असणारे अपात्र असतील.

पीएम इंटर्नशीप योजनेतून युवकांना रोजगारक्षम बनवण्याचा , त्यांना प्रत्यक्ष कामाचा अनुभव मिळावा व त्यांची कौशल्ये विकसित व्हावीत हा या योजनेमागचा हेतू आहे. परंतू ही योजना शासनाकडून किंवा कंपनीकडून कोणत्याही प्रकारची कायम किंवा करार पद्धतीची नोकरी प्रशिक्षणार्थीला देण्याची हमी देत नाही.

होय. करार पद्धतीने नोकरीत असणारे किंवा त्यांचे कुटुंबीय पीएम इंटर्नशिप योजनेसाठी अर्ज करण्यास पात्र असतील.

  • संकेतस्थळावरील प्रत्येक इंटर्नशिप संधीसाठी लाभार्थ्यांचा एक गट निवडला जाईल. (अर्जदाराने दिलेल्या माहितीच्या आधारे Artificial Intelligence द्वारे)
  • लाभार्थ्याची निवड त्याने दिलेल्या प्राधान्य क्रमानुसार व कंपनीच्या गरजेनुसार केली जाईल. निवड सर्वसमावेशक असेल. अनु.जाती, अनु. जमाती, इतर मागासवर्गीय, अपंगांसह सर्वाना योग्य संधी मिळेल याची खात्री करून उपलब्ध संधींच्या २-३ पटीत लाभार्थ्यांची शिफारस शासन कंपनीला करेल.
  • कंपनी त्यांच्या गरजेनुसार , पात्रतेनुसार , पद्धतीनुसार लाभार्थ्यांची निवड करेल. कंपनी लाभार्थ्यांना इंटर्नशिप साठी ऑफर लेटर संकेतस्थळावरून देईल.
  • लाभार्थ्याला एका फेरीत २ इंटर्नशिप ऑफर मिळू शकतात.

अर्जदाराने कंपनीचा पीएम इंटर्नशिप योजनेचा प्रस्ताव स्वीकारून इंटर्नशिप साठी रुजू झाल्यावर शासन प्रासंगिक अनुदान म्हणून प्रशिक्षणार्थीस एकदाच ६००० हजार रुपये  DBT प्रणालीद्वारे देईल.

  • All
  • Government Schemes
  • Student
  • Uncategorised

Share

1 thought on “PM Internship Scheme 2024: पात्रता, लाभ इ. बद्दल सविस्तर माहिती”

  1. Sachin Thorat

    अतिशय उत्कृष्ट माहिती..!
    अशीच उत्तम आणि उपयुक्त माहिती आपण देत राहावी ही विनंती, कारण याचा फायदा अलीकडच्या काळात भरकटलेल्या तरुणाईला मार्गदर्शन आणि दिशा देणारी ठरेल.👍

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top