mahaed.com

Pradhan Mantri Fasal Bima Yojana

Share

Pradhan Mantri Fasal Bima Yojana Marathi

अनुक्रमणिका

प्रस्तावना:

Pradhan Mantri Fasal Bima Yojana अंतर्गत “ पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना” राबवली जाते. शेतकर्‍यांना शाश्वत उत्पन्न मिळून देण्यात फळ पिकांचा प्रमुख वाटा आहे. इतर पिकांपेक्षा फळ पिकांपासून मिळणारे उत्पन्न जास्त किमतीचे आहे, परंतू अपेक्षित उत्पन्न झाले नाही तर त्यापासून होणारे नुकसान देखील खूप मोठे आहे. विविध हवामान धोक्यांमुळे फळ पिकांच्या उत्पादकतेवर विपरीत परिणाम होऊन उत्पादनात घट होते. अशा वेळी शेतकर्‍यांना नुकसान भरपाई मिळावी आणि  शेतकर्‍यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखले जावे म्हणून शासनाने Pradhan Mantri Fasal Bima Yojana अंतर्गत “ पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजना” सुरु केली आहे. 

सदरील लेखात Pik Vima Yojana 2024 साठी अर्ज करताना आवश्यक Pik Pera Form, Pik Vima Samaik Kshetra Sahamati Patra तसेच Navat Badal Swayamghoshana patra यांचे PDF व Word नमुने देणार आहोत. त्यासोबतच Pik Vima Yojana Maharashtra 2024 साठी फळ बागेचा विमा कसा भरायचा व त्यासाठी आवश्यक सर्व गोष्टींची माहिती घेणार आहोत.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana लाभ:

  1. नैसर्गिक आपत्ती व हवामानातील प्रतिकूल परिस्थितीमुळे फळ पिकांचे नुकसान झाल्यास शेतकऱ्यांना विमा संरक्षण मिळते.
  2. पीक नुकसानीच्या कठीण परिस्थितीतही शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राहते.

Pradhan Mantri Fasal Bima Yojana उद्दिष्ट्ये:

  1. शेतकऱ्यांच्या फळपिकांना नैसर्गिक आपत्तींपासून व हवामानातील प्रतिकूल बदलांपासून होणाऱ्या नुकसानी साठी विमा संरक्षण देणे.
  2. पडत्या काळात शेतकऱ्यांचे आर्थिक स्थैर्य आबाधित राखणे.
  3. शेतकऱ्यांना नाविन्यपूर्ण व सुधारीत मशागतीचे तंत्रज्ञान वापरण्यास प्रोत्साहन देणे.
  4. उत्पादनातील विविध जोखमींपासून शेतकऱ्यांचे संरक्षण , अन्नसुरक्षा, पिकांचे विविधीकरण , कृषि क्षेत्राचा गतिमान विकास व स्पर्धात्मकतेत वाढ यांसारखे हेतू साध्य करने.

पात्रता:

  1. सदरची योजना फक्त अधिसूचित फळ पिकांसाठी आहे. (अधिसूचित फळ पिकांची माहिती अधिकृत शासन निर्णय मध्ये असते.)
  2. कर्जदार तसेच बिगर कर्जदार शेतकर्‍यांसाठी ऐच्छिक.
  3. कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारा शेतकरी पात्र. (अशा शेतकर्‍यांकडे नोंदनिकृत भाडेकरार असावा. विमा उतरवताना संकेतस्थळावर Upload करणे बंधनकारक.)
  4. अ. कोकण विभाग – शेतकऱ्याकडे कमीत कमी १० गुंठे (०.१० हे.आर.) उत्पादनक्षम फळबाग असावी. राज्याचा उर्वरित भाग – शेतकऱ्याकडे कमीत कमी २० गुंठे (०.२० हे.आर.) उत्पादनक्षम फळबाग असावी. क. एक शेतकरी सर्व फळ पिके व दोन्ही हंगाम (मृग व आंबिया) मिळून जास्तीत जास्त  ४.०० हे.आर. (१० एकर) पर्यंतच विमा भरू शकतो.
  5. एका फळ पिकासाठी फक्त एकाच हंगामाकरिता (मृग किंवा आंबिया बहार) विमा भारता येऊ शकतो.
  6. फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.
  7. विमा संरक्षण फक्त उत्पादनक्षम फळ बागांनाच लागू आहे.  

उत्पादनक्षम फळबागांचे वय

अ.क्र.अधिसूचित फळ पीक उत्पादनक्षम वय (वर्षे)
आंबा
चिकू
काजू
लिंबू
संत्रा
मोसंबी
सिताफळ
पेरू
द्राक्ष
१०डाळिंब

अपात्रता : (फौजदारी कारवाईस पात्र बोगस पीक विमा प्रकरणे )

  • ज्या क्षेत्रासाठी विमा भरला आहे, त्या क्षेत्राच्या ७/१२ उतार्‍यावर शेतकर्‍याचे नाव नसणे.
  • बोगस पीक पेरा नोंदीच्या आधारे बोगस प्रकरण करणे.
  • दुसऱ्या शेतकऱ्याच्या शेतीवर अधिकृत भाडे करार न करता विमा भरणे.
  • उत्पादनक्षम वयाची फळबाग नसताना विमा भरणे.

Pik Vima Yojana 2024 आवश्यक कागदपत्रे :

  • आधार कार्ड (नसेल तर Aadhar Enrollment Receipt चालते.)
  • बँक पासबुक
  • ७/१२ उतारा
  • फळ बागेचा Geo-Tagging केलेला फोटो. (Ex. NoteCam सारखे मोबाईल application वापरावे.)
  • स्वयंघोषणापत्र – पीकपेरा
  • सामाईक क्षेत्र असल्यास स्वयंघोषणापत्र
  • शेतकऱ्याच्या नावात बदल असल्यास स्वयंघोषणापत्र इत्यादी.

प्रधानमंत्री फसल बिमा योजना - प्रपत्र

प्रधानमंत्री फसल बिमा योजना - अर्ज करण्यासाठी आवश्यक असणारे स्वयंघोषणापत्रे , पीक पेरा व इतर आवश्यक प्रपत्रे
अ.क्र.नावWord FormatPDF Format
पीक पेरा प्रमाणपत्र - फळबाग २०२४pikpera-ghoshanapatra-marathipikpera-ghoshanapatra-marathi
सामाईक क्षेत्र सहमतीपत्रpik-vima-samaik-kshetra-sahamatipatra-marathipik-vima-samaik-kshetra-sahamatipatra-marathi
नावात बदल स्वयंघोषणापत्रnavat-badal-ghoshanapatra-pik-vima-marathinavat-badal-ghoshanapatra-pik-vima-marathi

ग्रामपंचायत मार्फत दिले जाणारे दाखले, स्वयंघोषणापत्रे, विविध प्रकारचे प्रतिज्ञापत्रे व वेगवेगळ्या योजनांचा लाभ घेण्यासाठी लागणारे अर्ज नमुने PDF व Word File Format मध्ये वापरासाठी दिले आहेत.

विमा कंपनीची भूमिका व जबाबदारी :

  • पीक विमा कंपनीचे पुणे येथे मुख्यालय असेल. तसेच विमा कंपनीचा राज्य समन्वयक म्हणून मराठी भाषिक व्यक्तीची नेमणूक करावी.
  • नुकसान भरपाई निश्चित करणे व अदा करणे.
  • तालुका स्तरावर “ फसल बीमा कार्यालय” उघडुन कमीत कमी एक प्रतिनिधी नेमावा. जिल्हा स्तरावर कृषी पदवीधारक प्रतिनिधीची नेमणूक करावी.
  • नुकसान भरपाई निश्चित करण्यासाठी पर्यवेक्षकाची नेमणूक करावी.
  • जबाबदारी व भूमिका याची सविस्तर माहितीसाठी – अधिकृत शासन निर्णय पाहणे.

जन-सुविधा केंद्रावरील गाव पातळी सेवक (व्ही.एल.ई.) : (सेतूचालक)

  • शेतकर्‍यांना Pik Vima Yojana योजनेची वैशिष्ठ्ये समजावून सांगणे.
  • शेतकऱ्यांचे विमा प्रस्ताव विहीत प्रपत्रात आवश्यक कागदपत्रांसह स्वीकारून भरून देणे.
  • शेतकऱ्याच्या विमा प्रस्तावाची संचिका (Hard Copy) आपले सरकार केंद्र चालकांनी नुकसान भरपाई मिळेपर्यंत किंवा दोन वर्षे यापैकी जे नंतर असेल तोपर्यंत स्वतःजवळ सांभाळून ठेवणे बंधनकारक आहे. इत्यादी.

अर्ज करण्याचा कालावधी : (शेवटची तारीख)

अर्ज करण्याचा कालावधी - मृग बहार

अ.क्र.फळबागदिनांक
मोसंबीदिनांक ३० जून
संत्रा२५ जून २०२४.
द्राक्ष – (क)२५ जून २०२४.
पेरू२५ जून २०२४.
लिंबू२५ जून २०२४.
चिकूदिनांक ३० जून
डाळिंबदिनांक १४ जुलै
सिताफळदिनांक ३१ जुलै

अर्ज करण्याचा कालावधी - आंबिया बहार

अ.क्र.फळबागदिनांक
द्राक्षदि. १५ ऑक्टोबर
मोसंबीदि. ३१ ऑक्टोबर
केळीदि. ३१ ऑक्टोबर
पपईदि. ३१ ऑक्टोबर
संत्रादि. ३० नोव्हेंबर
काजुदि. ३० नोव्हेंबर
आंबा (कोकण)दि. ३० नोव्हेंबर
आंबा (इतर जिल्हे)दि. ३१ डिसेंबर
डाळिंबदि. १४ जानेवारी
१०स्ट्रॅाबेरीदि. १४ ऑक्टोबर

अर्ज करण्याची पद्धती :

  • आपले सरकार सेवा केंद्र : (सेतू)
          जवळच्या “आपले सरकार सेवा केंद्र ” (सेतू) येथे जाऊन शेतकरी Pradhan Mantri Fasal Bima Yojana अंतर्गत फळबगेचा विमा भरू शकता.
  • योजनेचे अधिकृत शासकिय संकेतस्थळ :
          आपण स्वतः आपल्या फळबागेचा विमा भरू शकता. शासनाने यासाठी अधिकृत संकेतस्थळ विकसित केले आहे. येथे पहा.

विमा हप्ता रक्कम :

नुकसान भरपाई मिळण्याची प्रमाणके :

Pradhan Mantri Fasal Bima Yojana अंतर्गत फळबागेचा विमा कोणत्या परिस्थितीत मंजूर होऊ शकतो यासाठी प्रमाणके (Trigger Points) निश्चित केली आहेत. याच अटींच्या अधीन राहून पीक विमा वाटप केले जाते म्हणून शेतकऱ्यांनी या बाबींचा काळजीपूर्वक अभ्यास करून विमा भरावा. 

फळबागेच्या प्रकारानुसार नुकसान भरपाईची प्रमाणके व भरपाईची रक्कम खालील प्रमाणे :

विमा कंपनी माहिती - Insurance Company Details:

विमा कंपनी बद्दल माहीती येथे वाचा : Click Here

स्त्रोत:

महाराष्ट्र शासन निर्णय : फवियो-२०२४/ प्र.क्र. ८१/१०-अे , दिनांक १२ जून, २०२४

Click Here To Download

Frequently Asked Questions:

  • कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारा शेतकरी पात्र आहे. अशा शेतकर्‍यांकडे नोंदनिकृत भाडेकरार असावा. विमा उतरवताना संकेतस्थळावर Upload करणे बंधनकारक.
  • कुळाने अगर भाडेपट्टीने शेती करणारा शेतकरी पात्र. अशा शेतकर्‍यांकडे नोंदनिकृत भाडेकरार असावा. विमा उतरवताना संकेतस्थळावर Upload करणे बंधनकारक.

अ. कोकण विभाग – शेतकऱ्याकडे कमीत कमी १० गुंठे (०.१० हे.आर.) उत्पादनक्षम फळबाग असावी.

ब. राज्याचा उर्वरित भाग – शेतकऱ्याकडे कमीत कमी २० गुंठे (०.२० हे.आर.) उत्पादनक्षम फळबाग असावी

क. एक शेतकरी सर्व फळ पिके व दोन्ही हंगाम (मृग व आंबिया) मिळून जास्तीत जास्त  ४.०० हे.आर. (१० एकर) पर्यंतच विमा भरू शकतो

एक शेतकरी सर्व फळ पिके व दोन्ही हंगाम (मृग व आंबिया) मिळून जास्तीत जास्त  ४.०० हे.आर. (१० एकर) पर्यंतच विमा भरू शकतो.

फळपीक विमा योजनेत सहभागी होण्यासाठी शेतकऱ्यांनी ई-पीक पाहणी करणे बंधनकारक आहे.

  • पुनर्रचित हवामान आधारीत पीक विमा योजनेचा विमा काढताना फळ बागेचा Geo-Tagging केलेला फोटो बंधनकारक आहे.
  • All
  • Government Schemes
  • Student
  • Uncategorised
Categories :

Share

Leave a Comment

Your email address will not be published. Required fields are marked *

Scroll to Top