Table of Contents
प्रस्तावना :
- Non creamy layer म्हणजे आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचा प्रवर्ग.
- मा. सर्वोच्च न्यायालयाने इंदिरा सहानी व इतर – या खटल्यात इतर मागासवर्ग प्रवर्गाकरिता क्रीमी लेयरचे तत्व लागू करण्याचा आदेश दिला.(याचिका क्र. ९३०/९०, दिनांक १६.११.१९९२)
- भारत सरकारच्या Ministry of Personnel, Public Grievances and Pensions (Department of Personnel and Training) विभागाने मेमोरेंडम क्र. ३६०१२/२२/९३ – इएसटीटी (एससीटी), दिनांक ०८.०९.१९९३. नुसार क्रीमी लेयरचे तत्व लागू केले आहे.
- केंद्र शासनाने विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांना आरक्षणाचा लाभ घेता यावा व समाजातील उन्नत व प्रगत व्यक्ती / गट यांना आरक्षणातून वगळता यावे यासाठी क्रीमी लेयर चे तत्व लागू केले.
- आरक्षणाचा लाभ मिळवण्यासठी Non Creamy Layer Certificate सादर करणे आवश्यक असते.
- सदरील लेखात आपण non creamy layer certificate कसे काढायचे ? त्याचा फायदा, पात्रता, अपात्रता याविषयी संपूर्ण माहिती पाहणार आहोत. तसेच obc creamy layer and non creamy layer यांतील फरक समजून घेणार आहोत. Non creamy layer affidavit चा word आणि pdf स्वरूपातील नमुना Download करण्यासाठी लेखात लिंक दिली आहे.
व्याख्या : What is non creamy layer certificate?
- नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र म्हणजे उन्नत व प्रगत व्यक्ती / गटामध्ये मोडत नसल्या बाबतचे प्रमाणपत्र.
- मागील सलग तीन वर्षामध्ये रु. ८ लाखांपेक्षा (किंवा सरकारने त्यावेळी ठरवले असेल त्यापेक्षा) कमी कौटुंबीक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र दिले जाते.
- विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा यात समावेश होतो.
- नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच आरक्षणाचा लाभ घेता येतो.
- उपविभागीय अधिकारी (महसूल) यांचे कार्यालयाकडून उन्नत व प्रगत व्यक्ती / गटामध्ये मोडत नसल्या बाबतचे प्रमाणपत्र (Non Creamy Layer Certificate) आपण सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून दिले जाते.
पात्रता : Non creamy layer eligibility
- लाभार्थी भारतीय नागरिक असावा.
- इतर मागासवर्ग प्रवर्ग, विमुक्त जाती , भटक्या जमाती व विशेष मागास प्रवर्गातील (यात मुस्लीम गटाचा समावेश आहे) असावा.
- मागील तीन वर्षाच्या वार्षिक उत्पन्नापैकी कोणत्याही एका वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे केंद्रशासनाने विहित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी असावे. (सध्या कुटुंबाची वार्षिक उत्पन्न मर्यादा ८ लाख रुपये आहे. भारत सरकारने १ सप्टेबर, २०१७ पासुन नॉन क्रीमी लेयरसाठी उत्पन्नाची मर्यादा रु. ८ लाख लागू केली आहे. महाराष्ट्र शासनाने १६ डिसेंबर, २०१७ रोजी आदेश काढुन १ सप्टेबर, २०१७ पासुन सरकारचा निर्णय महाराष्ट्रात लागू केला.)
- लाभार्थ्याकडे स्वतःचा उपविभागीय अधिकारी (महसूल) यांचे कार्यालयाकडून प्राप्त केलेला जातीचा दाखला असावा.
टिप : शालेय शिक्षण व क्रीडा विभाग महाराष्ट्र शासन यांच्या , दिनांक १७ ऑगस्ट, २०१० रोजीच्या शासन निर्णयानुसार ‘ अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय/निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी आरक्षणात असणारी उन्नत व प्रगत व्यक्ती / गटामध्ये संवर्ग (नॉन क्रीमी लेयरचे प्रमाणपत्र) ची तरतूद वगळण्यात आली आहे. म्हणजे संबंधित खेळाडूंना ‘क्रीमी लेयरचे तत्व’ लागू नाही. (शालेय शिक्षण व क्रीडा विभाग यांच्या , दिनांक ३० एप्रिल, २००५ रोजीच्या शासन निर्णयानुसार अत्युच्च गुणवत्ताधारक खेळाडूंना शासकीय/निमशासकीय व इतर क्षेत्रात नोकरीसाठी सरळ सेवा भरतीमध्ये ५% समांतर आरक्षण ठेवण्याची तरतूद केली आहे.)
आवश्यक कागदपत्रे : Non creamy layer certificate documents
- नॉन क्रीमी लेयर सर्टिफिकेट मराठी कागदपत्रे खालीलप्रमाणे :
हे वाचा : उत्पन्न दाखला कसा काढायचा ?
अर्ज कसा करावा?: Non creamy layer certificate application process
महाराष्ट्र राज्यात नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र काढण्यासाठी खालील दोन पद्धती वापरतात.
- जवळच्या महा-ई-सेवा केंद्राला भेट द्या. सर्व आवश्यक कागदपत्रांची पूर्तता करा. केंद्रचालक आपल्याला दाखला मिळून देतील. (जवळचे महा-ई-सेवा केंद्र शोधा. Click Here.)
- स्वतःचा दाखला स्वतः काढू शकता. त्यासाठी खालील पद्धत वापरा.
- अधिकृत संकेतस्थळावर जा.Click Here.
- नवीन युजर नोंदणी करा. (‘नवीन युजर ? येथे नोंदणी करा’ या tab मध्ये)
- आपले युजर आयडी व पासवर्ड वापरून लॉगीन करा.
- विभाग महसूल (Revenue), उपविभाग महसूल सेवा (Revenue Services) मध्ये Non Creamy Layer हा पर्याय निवडा. (किंवा Search Bar मध्ये Non Creamy Layer शोधावे.)
- पुढे जाऊन ‘सर्व्हिस लिस्ट’ पर्याय निवडा व त्यात ‘Non Creamy Layer’ पर्याय निवडा. (Dashboard या पर्यायामध्ये आपण केलेले अर्ज , त्यांची सद्यस्थिती व मंजूर अर्ज पहावयास मिळतात.)
- ‘पुढे जा’ पर्यायावर क्लिक करा व तेथे सांगितल्या प्रमाणे अर्ज भरा व कागदपत्रे उपलोड करा. १ ते २१ दिवसांत आपल्या दाखल्यास उपविभागीय अधिकारी (महसूल) कार्यालयातून मंजुरी मिळेल.
- Dashboard या पर्यायामध्ये जाऊन आपले मंजूर झालेले non creamy layer certificate download करा.
अधिकृत शासकिय संकेतस्थळ : aaplesarkar.mahaonline.gov.in
प्रमाणपत्र वैधता : Non creamy layer certificate validity
- नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्राची वैधता १ वर्षापासुन ते ३ वर्षांपर्यंत असू शकते. (आर्थिक वर्ष – १ एप्रिल ते ३१ मार्च)
- कोणत्याही प्रकारचा लाभ घेण्यासाठी त्याला अर्ज करण्यापूर्वीच्या तारखेचे नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र काढलेले असावे.
- मागील तीन वर्षाच्या उत्पन्नापैकी कोणत्याही एका वर्षाचे वार्षिक उत्पन्न हे केंद्रशासनाने विहित केलेल्या मर्यादेपेक्षा कमी असल्यास (सध्या ही मर्यादा ८ लाख रुपये आहे.) संबंधितांस नॉन क्रीमी लेयरचे प्रमाणपत्र देण्यात येते.
- महाराष्ट्र शासनाने प्रमणपत्राच्या वैधता कालावधी साठी काही मार्गदर्शक सूचना केल्या आहेत, त्या खालील प्रमाणे –
- ज्या विद्यार्थी / उमेदवारांच्या पालकांचे मागील सलग तीन वर्षांतील प्रत्येक वर्षाचे उत्पन्न हे जर विहित मर्यादेपेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांना तीन वर्षाच्या कालावधीकरिता नॉन क्रीमी लेयरचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
- ज्या विद्यार्थी / उमेदवारांच्या पालकांचे मागील तीन वर्षाच्या उत्पन्नापैकी कोणत्याही दोन वर्षाचे उत्पन्न हे जर विहित मर्यादेपेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांना दोन वर्षाच्या कालावधीकरिता नॉन क्रीमी लेयरचे प्रमाणपत्र देण्यात यावे.
- ज्या विद्यार्थी / उमेदवारांच्या पालकांचे मागील तीन वर्षाच्या उत्पन्नापैकी एक वर्षाचे उत्पन्न हे जर विहित मर्यादेपेक्षा कमी असेल तर अशा विद्यार्थी/उमेदवारांना एक वर्षाच्या कालावधीकरिता नॉन क्रीमी लेयरचे प्रमाणपत्र देण्यात यावे. स्त्रोत – शासन निर्णय १७ ऑगस्ट, २०१३. क्र. २०१३०८१९१५३१०१७२२२
प्रमाणपत्राची सत्यता कशी पाहावी : Non creamy layer certificate verification
महाराष्ट्र राज्यात नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्राची सत्यता तपासणी साठी खालील प्रमाणे कृती करा –
- अधिकृत संकेतस्थळावर जा.Click Here
- प्रमाणित प्रमाणपत्राची पडताळणी हा पर्याय निवडा. (संकेतस्थळाच्या मुख्य पानावर उजव्या बाजूला उभ्या स्तंभात पर्याय दिलेला आहे.)
- Revenue Department -> Revenue Services -> Non Creamy Layer -> Application Number टाकुन Go पर्यायावर जा. तुम्हाला तुमच्या नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्राची ची माहिती मिळेल.
टिप : Application Number (Barcode Number) आपल्याला आपल्या नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्राच्या उजव्या बाजूच्या वरच्या कोपऱ्यात पाहायला मिळेल.
फायदे : Non creamy layer certificate Benefits
- शाळा आणि विद्यापीठामध्ये जागा आरक्षित असतात.
- नोकरी मिळवण्यात फायदा होतो.
- वयोमर्यादा वाढुन मिळते.
- परीक्षा देण्याच्या संधी जास्त मिळतात.
- सरकारी आणि निवडक खाजगी क्षेत्रातील नोकरीमध्ये प्राधान्य.
- शिक्षण शुल्क व परीक्षा शुल्क माफी.
- कर्ज प्रकरणांमध्ये अनुदान.
या सर्व गोष्टींचा लाभ मिळवण्यासाठी जातीच्या दाखल्यासोबतच नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र सादर करणे बंधनकारक.
फरक : Creamy layer and non creamy layer
- क्रीमी लेयर
- विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती / गट यांचा समावेश.
- मागील सलग तीन वर्षामध्ये प्रत्येक वर्षी रु. ८ लाखांपेक्षा (किंवा सरकारने त्यावेळी ठरवले आहे त्यापेक्षा) जास्त कौटुंबीक उत्पन्न असते.
- उन्नत/प्रगत व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही.
- नॉन क्रीमी लेयर
- विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा यात समावेश होतो.
- मागील सलग तीन वर्षामध्ये रु. ८ लाखांपेक्षा (किंवा सरकारने त्यावेळी ठरवले आहे त्यापेक्षा) कमी कौटुंबीक उत्पन्न असते.
- या गटातील व्यक्तींना आरक्षणाचे सर्व फायदे मिळतात.
- नॉन क्रीमी लेयर
क्रीमी लेयर म्हणजे काय ? Creamy layer meaning
- विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या उन्नत/प्रगत व्यक्ती / गट यांचा प्रवर्ग.
- मागील सलग तीन वर्षामध्ये प्रत्येक वर्षी रु. ८ लाखांपेक्षा (किंवा सरकारने त्यावेळी ठरवले आहे त्यापेक्षा) जास्त कौटुंबीक उत्पन्न असणाऱ्या लोकांचा यात समावेश होतो.
- अशा लोकांना घटनेने दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचा लाभ घेता येत नाही.
माहितीचा स्त्रोत : Internet
Frequently Asked Questions
- नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र म्हणजे उन्नत व प्रगत व्यक्ती / गटामध्ये मोडत नसल्या बाबतचे प्रमाणपत्र. (आर्थिकदृष्ट्या दुर्बल असल्याचे प्रमाणपत्र.)
- मागील सलग तीन वर्षामध्ये रु. ८ लाखांपेक्षा (किंवा सरकारने त्यावेळी ठरवले असेल त्यापेक्षा) कमी कौटुंबीक उत्पन्न असणाऱ्या व्यक्तींना नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र दिले जाते.
- विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा यात समावेश होतो.
- नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र असणाऱ्यांनाच आरक्षणाचा लाभ घेता येतो.
- उपविभागीय अधिकारी (महसूल) यांचे कार्यालयाकडून उन्नत व प्रगत व्यक्ती / गटामध्ये मोडत नसल्या बाबतचे नॉन क्रीमी लेयर प्रमाणपत्र आपण सादर केलेल्या कागदपत्रांची पडताळणी करून दिले जाते.
- विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या उन्नत/प्रगत व्यक्ती / गट यांचा प्रवर्ग.
- मागील सलग तीन वर्षामध्ये प्रत्येक वर्षी रु. ८ लाखांपेक्षा (किंवा सरकारने त्यावेळी ठरवले आहे त्यापेक्षा) जास्त कौटुंबीक उत्पन्न असणाऱ्या लोकांचा यात समावेश होतो.
- अशा लोकांना घटनेने दिलेल्या सामाजिक व शैक्षणिक आरक्षणाचा लाभ घेता येत नाही
- क्रीमी लेयर
- विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील उन्नत व प्रगत व्यक्ती / गट यांचा समावेश.
- मागील सलग तीन वर्षामध्ये प्रत्येक वर्षी रु. ८ लाखांपेक्षा (किंवा सरकारने त्यावेळी ठरवले आहे त्यापेक्षा) जास्त कौटुंबीक उत्पन्न असते.
- उन्नत/प्रगत व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही.
- नॉन क्रीमी लेयर
- विमुक्त जाती , भटक्या जमाती , इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्गातील आर्थिकदृष्ट्या दुर्बल घटकांचा यात समावेश होतो.
- मागील सलग तीन वर्षामध्ये रु. ८ लाखांपेक्षा (किंवा सरकारने त्यावेळी ठरवले आहे त्यापेक्षा) कमी कौटुंबीक उत्पन्न असते.
- या गटातील व्यक्तींना आरक्षणाचे सर्व फायदे मिळतात.
- Creamy Layer in OBC म्हणजे
- इतर मागासवर्ग प्रवर्गातील (OBC) उन्नत व प्रगत व्यक्ती / गट.
- मागील सलग तीन वर्षामध्ये प्रत्येक वर्षी रु. ८ लाखांपेक्षा (किंवा सरकारने त्यावेळी ठरवले आहे त्यापेक्षा) जास्त कौटुंबीक उत्पन्न असणारे इतर मागासवर्ग प्रवर्गातील (OBC) व्यक्ती.
- इतर मागासवर्ग प्रवर्गातील (OBC) उन्नत/प्रगत व्यक्तींना आरक्षणाचा लाभ मिळत नाही.
- Non creamy Layer in OBC म्हणजे –
- इतर मागासवर्ग प्रवर्गातील (OBC) आर्थिकदृष्ट्या दुर्बल लोकांचा यात समावेश होतो.
- मागील सलग तीन वर्षामध्ये रु. ८ लाखांपेक्षा (किंवा सरकारने त्यावेळी ठरवले आहे त्यापेक्षा) कमी कौटुंबीक उत्पन्न असते.
- इतर मागासवर्ग प्रवर्गातील (OBC) नॉन क्रीमी लेयर गटातील व्यक्तींना आरक्षणाचे सर्व फायदे मिळतात.
- All
- Government Schemes
- Student
- Uncategorised