अनुक्रमणिका
प्रस्तावना :
SSC 10th Result 2024 Maharashtra State Board: महाराष्ट्रातील दहावी च्या वर्गात शिक्षण घेत असणाऱ्या सर्वांसाठी आनंदाची बातमी! महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळाने दहावीच्या निकालाची तारीख व वेळ घोषित केली आहे. मंडळाच्या पुणे, नागपूर, छत्रपती संभाजीनगर, मुंबई, कोल्हापूर, अमरावती, नाशिक, लातूर व कोकण या नऊ विभागीय मंडळांमार्फत मार्च २०२४ मध्ये माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षा घेतली होती. सदरील परीक्षेचा निकाल मंडळाच्या कार्यपद्धतीनुसार अधिकृत संकेतस्थळांवर सोमवार दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
अधिकृत संकेतस्थळांची यादी खालील प्रमाणे :
SSC 10th Result 2024 Maharashtra State Board: निकालाबाबतचा सविस्तर तपशील पुढील प्रमाणे :
- माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस बसलेल्या सर्व विद्यार्थ्यांना त्यांच्या निकालासोबतच निकालाबाबतची इतर सांखिकी माहिती https://mahresult.nic.in या संकेतस्थळावर उपलब्ध होईल. तसेच शाळांना एकत्रित निकाल पाहायचा असल्यास https://mahahscboard.in या संकेतस्थळावर पाहता येऊ शकतो.
- निकालानंतर माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस बसलेल्या विद्यार्थ्यास स्वतःच्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची गुणपडताळणी व उत्तर पत्रिकांच्या छायाप्रती , पुनर्मूल्यांकनासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (http://verification.mh-ssc.ac.in) स्वतः किंवा शाळेमार्फत अर्ज करण्याची सोय उपलब्ध करून देण्यात आलेली आहे. त्यासाठीच्या अटी/शर्ती व सूचना संकेतस्थळावर देण्यात आलेल्या आहेत. गुणपडताळणी व छायाप्रतीसाठी मंगळवार, दिनांक २८.०५.२०२४ ते मंगळवार, दिनांक ११.०६.२०२४ पर्यंत अर्ज ऑनलाइन पद्धतीने करता येईल. त्यासाठी आवश्यक असणारे शुल्क Debit Card/ Credit Card/ UPI / Net Banking याद्वारे भारता येईल.
- मार्च २०२४ परीक्षेच्या उत्तरपत्रिकेच्या पुनर्मुल्यांकानासाठी ऑनलाइन पद्धतीने अर्ज मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून करण्यासाठी अगोदर उत्तरपत्रिकेची छायाप्रत घेणे अनिवार्य आहे. छायाप्रत मिळाल्यापासून कार्यालयीन कामाच्या पाच दिवसांत पुनर्मुल्यांकानाच्या कार्यपद्धतीचा अवलंब करून विहित नमुन्यात विहित शुल्क भरून संबंधित विभागीय मंडळाकडे विद्यार्थ्यांनी ऑनलाइन पद्धतीने अर्ज करावा. ज्या विद्यार्थ्यांना उत्तरपत्रिकेचे पुनर्मुल्यांकन करावयाचे आहे त्यांनी अधिक माहितीसाठी संबंधित विभागीय मंडळाकडे संपर्क साधावा.
- मार्च २०२४ परीक्षेच्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) परीक्षेस सर्व विषयांसह प्रविष्ट होऊन उत्तीर्ण होणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी लगतच्या दोनच संधी (जुलै-ऑगस्ट २०२४ व मार्च २०२५) श्रेणी/गुणसुधार (Class Improvement Scheme) योजनेंतर्गत उपलब्ध राहतील.
- जुलै-ऑगस्ट २०२४ मध्ये आयोजित करण्यात येणाऱ्या माध्यमिक शालांत प्रमाणपत्र (इ. १० वी) पुरवणी परीक्षेसाठी पुनर्परीक्षार्थी व श्रेणीसुधार विद्यार्थ्यांसाठी शुक्रवार दिनांक ३१.०५.२०२४ पासुन मंडळाच्या संकेतस्थळावरून ऑनलाइन पद्धतीने आवेदनपत्र भरून घेण्यात येणार आहे. त्याबाबतचे परिपत्रक स्वतंत्रपणे निर्गमित करण्यात येणार आहे.
उत्तरपत्रिका गुणपडतळणीसाठी (Verification of Marks) अटी/ शर्ती व सूचना :
- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेस प्रविष्ठ झालेल्या कोणत्याही विद्यार्थ्यास त्या परीक्षेतील स्वत:च्या अनिवार्य विषयांपैकी (श्रेणी विषयांव्यतिरिक्त ) कोणत्याही विशिष्ट विषयात त्याने संपादित केलेल्या गुणांची पडताळणी करण्यासाठी संबंधित विभागीय मंडळाकडे ऑनलाईन पद्धतीने मंडळाच्या अधिकृत संकेतस्थळावरून (website) स्वतः किंवा शाळा / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत अर्ज करता येईल. ज्या विषयांसाठी गुणपडताळणी करणे आवश्यक आहे ते सर्व विषय एकाचवेळी ऑनलाईन भरणे आवश्यक आहे. एकदा अर्ज केल्यानंतर पुन्हा अर्ज करता येणार नाही.
- गुणपडताळणीसाठी प्रती विषयास रु. ५०/- इतके शुल्क ऑनलाईन पद्धतीने (Debit Card/Credit Card/UPI/Net Banking) भरता येईल.
- गुणपडताळणीसाठी ऑनलाईन अर्जातील सर्व माहिती भरणे अनिवार्य असेल . अपूर्ण माहिती भरलेले अर्ज, कमी शुल्क भरलेले , शुल्क न भरलेले व मुदतीनंतर प्राप्त झालेले ऑनलाईन अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- गुणपडताळणी नंतर गुणात बदल झाल्यास सदरचा बदल विद्यार्थ्यावर बंधनकारक राहील. त्यानुसार गुणपडताळणीनंतर संबंधित विद्यार्थ्याची मूळ संपादणूक आपोआप रद्द होईल व गुण कमी झाले तरी सुधारित संपादणूक स्विकारणे विद्यार्थ्यास बंधनकारक राहील.
- सवलतीचे गुण मिळवून उत्तीर्ण झालेल्या विद्यार्थ्याने सवलतीचे गुण मिळालेल्या विषयाच्या गुणपडताळणीसाठी अर्ज केला असेल व गुण पडताळणीत विद्यार्थ्याचे अशा विषयातील गुण कमी झाल्याने तो सवलतीच्या गुणासाठी अपात्र ठरत असेल तर अशा प्रकरणी विद्यार्थ्याच्या उत्तीर्ण निकालात बदल करण्यात येईल व तो स्विकारणे बंधनकारक असेल.
- उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यानी गुणपडताळणी च्या निकालाची वाट न पाहता पुढील परीक्षेस प्रविष्ट होण्यासाठी विहित मुदतीत परीक्षेचे आवेदनपत्र संबंधित विभागीय मंडळाकडे माध्यमिक /उच्च माध्यमिक शाळेमार्फत / कनिष्ठ महाविद्यालयामार्फत सादर करणे आवश्यक आहे. निर्धारित मुदतीनंतर कोणत्याही परिस्थितीत पुढील परीक्षेचे आवेदनपत्र स्विकारले जाणार नाही.
- गुणपडताळणीमधील गुण वाढीमुळे विद्यार्थी सवलतीचे गुण मिळण्यास पात्र ठरत असल्यास त्यास ते गुण देय असतील.
- गुणात बदल नसलेल्या विद्यार्थ्याचे गुणपडताळणी शुल्क परत केले जाणार नाही मात्र गुणात बदल झालेल्या प्रकरणी विद्यार्थ्याने भरलेले शुल्क परत दिले जाईल.
- उत्तीर्ण विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ‘ नो चेंज’ (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीत कोणताही बदल न होणे व उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विद्यार्थ्यांना गुणपडताळणीअंती पाठविण्यात येणाऱ्या ‘ नो चेंज’ (No change) या निर्णयाचा अर्थ गुणपडताळणीनंतर गुणात कोणताही बदल न होणे किंवा गुणात पाच टक्क्यांहून कमी गुणांचा बदल झाल्यामुळे उत्तीर्ण होऊ न शकलेल्या विषयाच्या निकालात व एकूण निकालात कोणताही बदल न होणे असा असेल.
- गुणपडताळणीमध्ये विद्यार्थ्याच्या गुणात बदल झाल्यास तसे संबंधित विद्यार्थ्यास व संबंधित माध्यमिक शाळेस / उच्च माध्यमिक शाळेस / कनिष्ठ महाविद्यालयास कळविण्यात येईल.त्यानुसार विद्यार्थ्याचे मूळ गुणपत्रक विभागीय मंडळाकडे जमा केल्यानंतर त्यास सुधारित गुणपत्रक देण्यात येईल.
- उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/ यासाठी माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेसाठी http://verification.mh-ssc.ac.in व उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेसाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील.
- माध्यमिक शालान्त प्रमाणपत्र (इ.१० वी) परीक्षेनंतरच्या स्थलांतर पप्रमाणपत्रासाठी http://verification.mh-ssc.ac.in व इ. ११ वी तसेच उच्च माध्यमिक प्रमाणपत्र (इ.१२ वी) परीक्षेनंतरच्या प्रमाणपत्रासाठी http://verification.mh-hsc.ac.in या संकेतस्थळावरून आलेले अर्ज ग्राह्य धरण्यात येतील.
- विध्यार्थ्याने उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र यासाठी करावयाच्या ऑनलाईन भरावयाची माहिती बिनचूक भरावी. अर्ज प्रणालीमध्ये SUBMIT केल्यानंतर त्यात कोणताही बदल करता येणार नाही.
- ऑनलाईन प्रणालीमध्ये विद्यार्थ्यास उत्तरपत्रिका गुणपडताळणी/छायाप्रत/पुनर्मूल्यांकन/स्थलांतर प्रमाणपत्र या प्रत्येक बाबीसाठी फक्त एकदाच अर्ज करता येईल. त्यामुळे अर्ज भरण्यापूर्वी विषयाची संख्या निश्चित करूनच अर्ज भरण्याची कार्यवाही करावी .कोणत्याही परिस्थितीत दुबार अर्ज स्विकारले जाणार नाहीत.
- उत्तरपत्रिका पुनर्मूल्यांकन करण्याकरिता अर्ज करतांना विषय शिक्षकांचा अभिप्राय PDF File स्वरूपात (File Size १५ MB पर्यंत) अपलोड करणे अनिवार्य आहे तसेच सदर अभिप्राय सुस्पष्ट असणे आवश्यक आहे. (विषय शिक्षकांचा अभिप्राय PDF File नमुना येथे पहा.)
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सोमवार दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
महाराष्ट्र राज्य माध्यमिक व उच्च माध्यमिक शिक्षण मंडळामार्फत सोमवार दिनांक २७/०५/२०२४ रोजी दुपारी ०१.०० वाजता ऑनलाईन जाहीर करण्यात येणार आहे.
SSC 10th Result 2024 Maharashtra State Board (इ.१० वी) च्या गुणपडताळणीसाठी प्रती विषयास रु. ५०/- इतके शुल्क महामंडळामार्फत आकारले जाते.