जात पडताळणी प्रमाणपत्र काढण्यासाठी पात्रता काय असते? अर्ज कसा करायचा? व त्यासाठी कोणती कागदपत्रे आवश्यक असतात? सविस्तर माहिती पाहणार आहोत.
लाभार्थीच्या जातीच्या दाखल्याची वैधता शैक्षणिक व महसूली पुराव्यांच्या आधारे जिल्हा जात प्रमाणपत्र पडताळणी समिती मार्फत तपासली जाते. सदरील प्रमाणपत्र वैध आढळून आल्यास लाभार्थ्याला जातवैधता प्रमाणपत्र दिले जाते.
१. शिक्षण : १० वी, १२ वी नंतर व्यावसायिक शिक्षणासाठी. २. नोकरी : आरक्षित जागेवर नोकरी मिळाल्यास. ३. निवडणुक : आरक्षित जागेवर निवडणुक जिंकल्यास. ४. इतर : आरक्षित जागेवर पेट्रोल पंप इत्यादी घेण्यासाठी.
आवश्यक कागदपत्रांची सविस्तर माहिती आणि प्रतिज्ञापत्रांचे नमुने PDF व Word स्वरुपात माझ्या Blog मध्ये दिले आहेत. Blog वाचण्यासाठी शेवटच्या slide मध्ये लिंक दिली आहे.
महाराष्ट्र शासनाचे स्वतःचे जातीचे प्रमाणपत्र पडताळणीसाठी अधिकृत संकेतस्थळ आहे. https://ccvis.barti.in येथे अर्ज भरल्यानंतर त्याची संचिका स्वहस्ते जिल्हा जात पडताळणी समिती यांचे कार्यालयात जमा करावी.
१. तीन महिन्यांच्या कालावधीत जातवैधता प्रमाणपत्र मिळते. २. मिळालेल्या प्रमाणपत्राची वैधता कायमस्वरूपी असते. ३. प्रमाणपत्राची सत्यता तपासण्यासाठी अधिकृत संकेतस्थळावरील Verify Validity Certificate पर्यायाचा वापर करावा.
१. आरक्षित प्रवर्गातून प्रवेश. २. शैक्षणिक शुल्क माफी किंवा सवलत. ३. शिष्यवृत्ती मिळते.
१. नोकरीत Promotion साठी फायद्याचे. २. नोकर भरतीत राखीव जागा असतात.
आरक्षित जागांवर निवडणुक लढवण्यासाठी जातवैधता प्रमाणपत्र आवश्यक असते.
– Email – helpdesk@barti.in – Helpline Toll Free Number (24*7): 1800 120 8040 – Whats App Complaint Number: 9404999452 / 9404999453 याव्यतिरिक्त अधिकृत संकेतस्थळावर जिल्हा निहाय आणखी संपर्क पर्याय दिले आहेत.